Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीम्हासुर्णे येथील जि. प.प्राथ.शाळा येथे नवागतांचे स्वागत

म्हासुर्णे येथील जि. प.प्राथ.शाळा येथे नवागतांचे स्वागत

म्हासुर्णेः म्हासुर्णे दि.17जून 2019रोजी जि. प.प्राथमिक शाळा पवारवाडी येथे शाळा प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांतर्गत शालेय वर्गखोल्या तसेच शालेय परिसर स्वच्छ केला.त्यासाठी दोन दिवसापासून तयारी केली होती. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने नवीन विद्यार्थी इयत्ता1 लीत प्रवेश घेणारे अगदी हसतमुख शाळेला आले होते.शाळेत प्रवेशद्वारात व वर्गासमोर रांगोळी काढली होती.शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेशोत्सवासाठी पालकवर्ग उपस्थित होता.नवीन दाखलपात्र विद्यार्थी,विद्यार्थीनींचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढली.शालेय चमू हातामध्ये फुगे घेऊन तसेच घोषणा फलक घेऊन गावातुन साक्षरतेचा दिवा,घरोघरी लावा,मुलगा मुलगी एकसमान,दोघांनाही शिकवू छानया घोषणा बालगोपाळांनी दिल्या.चला चला चला शाळा सुरु झाली असा संदेश दिला.सदर प्रभातफेरीत मोठ्या संख्येने ग्रामस्थही सहभागी झाले होते. यानंतर शाळेमध्ये पालकसभा आयोजित करून आलेल्या मान्यंवर म्हासुर्णे गावचे ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,शिक्षण कमेठी अध्यक्ष विश्वनाथ माने,संचालक सचिन माने,किशोर माने,पोपट माने,मंगल निकम,शैलजा निकम,उज्वला माने पालकांच्या हस्ते त यांच्या हस्ते शालेय 1 ते 4 च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले.सोबत उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.मुख्याध्यापक मंगल माने मँडम यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्प व श्रीफळ देवून स्वागत केले.ग्रामस्थ व मान्यवरांचे आभार शाळेचे सहकारी शिक्षक मंगेश जरग(सर) यांनी मनापासून आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,शाळा व्वस्थापन कमेठी अध्यक्ष विश्वनाथ माने,संचालक संचिन माने,किशोर माने,पोपट माने,मंगल निकम,शैलजा निकम.उज्वला माने,उपस्थित होते.प्रास्तविक व आभार मंगेश जरग (सर) यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular