सातारा : सुट्टी संपवून सुट्टीतील गोड आठवणी उराशी बाळगून आज काहींनी उत्साहाने तर काहींनी जड अंत:करणाने शाळेची वाट धरली. आज 17 जूनला नवी शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आणि मुलांच्या किलबिलाटासह शाळेतून येणारे घंटेचे सूर, पाठीवरील नवीकोरी दप्तरे, अंगात घातलेला नवीन गणवेश आणि याच उत्साहात भर पडली ती इयत्ता आठवी पर्यंतच्या मुला मुलींना शाळेतून मिळालेली नवीन पुस्तके यामुळे. गेल्या काही दिवसांपासून शालेय आवाराची स्वच्छता करुन नवीन शैक्षणिक वर्षाला आज सुरुवात झाली. यानिमित्त शाळांपुढे स्वागत कमानीही घालण्यात आल्या होत्या. तसेच मुलांचा आनंद वाढवणारी बालगीते, सुबक रांगोळ्या व विविध रंगी फुला पानांनी शाळांना सुशोभीत करण्यात आले होते. सातारा शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या प्रवेश व्दारात आकर्षक स्वागत कमान उभारली होती.सातारा शहरातील नगर परिषद शिक्षण मंडळाच्या वतीने चालवण्यात येणार्या पालिकेच्या विविध शाळामध्ये मुलांचे स्वागत शिक्षकांनी गुलाब पुष्प देवून तसेच शालेय वह्यांचे वितरण करुन केले. यावर्षी प्राथमिक शाळेतील इयत्ता 2री आणि महाविद्यालयीन गटातील इयत्ता 11वीची पुस्तके बदलल्याने ती अद्याप उपलब्ध झालेली नाहीत.
सुट्टी संपवून नव्या शैक्षणिक वर्षास सुरुवात
RELATED ARTICLES

