कोरेगाव ः वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ईव्हीएम हटाओ देश बचाओ अंतर्गत कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बर्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते. त्यामुळे वंचित आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे घंटानाद आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला आघाडीच्या कार्यकर्त्यानी कोरेगावातून मोठा प्रतिसाद दिला.
कोरेगाव तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर कोरेगाव तालुकाध्यक्ष रामचंद्र बनवडे, तालुका सचिव विजय मोरे, विठ्ठल झेले पाटील, उपाध्यक्ष बाबा आवाडे, चंद्रकांत कांबळे, युवक अध्यक्ष सुनील बडेकर यांच्यासह संजय करपे, जगन्नाथ वाघमारे, जयसिंग माने, प्रमोद सोनावणे, वसंतराव बुधावले, महादेव मोरे, संजय भोसले, विश्वनाथ सावंत आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाओ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन यावेळी या सर्वानी तहसिलदार यांना दिले.
कोरेगाव येथे वंचित आघाडीचे घंटानाद आंदोलन
RELATED ARTICLES