Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीकेळघरमध्ये एसटी महामंडळाच्या वाहक व चालक यांचा प्रामाणिकपणा

केळघरमध्ये एसटी महामंडळाच्या वाहक व चालक यांचा प्रामाणिकपणा

केळघरःसध्याच्या काळात प्रामाणिकपणा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मात्र नोकरी करीत असताना प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मनात जपून खरया अथार्ने प्रवासी जनतेची सेवा करण्याचे काम एसटी महामंडळातील कामगारांकडून होत असते. याचा प्रत्यय नुकताच जाणवून आला. रोहा -सातारा या गाडीवर सेवा बजावत असताना गाडीत प्रवास करीत असलेल्या प्रवाशाची बॅग सुरक्षितपणे त्या प्रवाशाकडे देण्याची कामगिरी रोहा आगाराचे वाहक आनंदा लोहार व चालक श्री. घाडगे यांनी केली आहे. या बॅगेत अंदाजे आठ ते दहा तोळे सोने तसेच रोख रक्कम व इतर दैनंदिन वापराच्या वस्तु, औषधे तसेच महत्त्वाची कागदपत्रेही होती. आपल्या वस्तु परत सुरक्षितपणे मिळाल्याबदुदल प्रवासी प्रशांत देशमुख यांनी वाहक लोहार व चालक श्री. घाडगे यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत देशमुख हे काल (सोमवारी) रोहा सातारा गाडीतून प्रवास करीत होते. त्यांनी आपली पिशवी बसमध्येच ठेवली होती. ते महाडमध्ये या बसमधून उतरले. मात्र थोड्या वेळाने त्यांना आपली बॅग गाडीतच राहिल्याचे जाणवले. त्यांनी तत्काळ रोहा आगाराशी संपकर् साधून त्या गाडीवर ड्यूटी करणाऱया चालक- वाहकांना आपली बॅग गाडीत विसरल्याचे सांगितले. त्याचवेळी वाहक श्री. लोहार यांनी महाबळेश्वर बसस्थानकात गाडी आल्यानंतर ही बॅग आगार व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांच्या कडे दिली. बॅगेतील वस्तुंचा पंचनामा करण्यात आला. श्री. देशमुख हे महाबळेश्वर येथे येवून ओळख पटवून आपली बॅग घेवून गेले.यावेळी आगार व्यवस्थापक श्री.पतंगे, वरिष्ठ लेखाकार अमोल शेलार, वाहतूक नियंत्रक किरण धुमाळ, वरिष्ठ लिपीक महेश शिंदे, सुरक्षा रक्षकांच्या हस्ते श्री. देशमुख यांना ही बॅग परत करण्यात आली. या बॅगेत अंदाजे आठ ते दहा तोळे सोने होते. वाहक लोहार यांच्याशी वेळेत संपकर् झाल्याने श्री. देशमुख यांना आपली बॅग मिळाली. रोहा आगाराच्या चालक-वाहकांनी प्रामाणिकपणे बॅग जमा केल्याबद्दल महाबळेश्वर येथे आगार व्यवस्थापक श्री. पतंगे यांनीही या चालक- वाहकांचे अभिनंदन केले. आपली बॅग सुरक्षितपणे मिळाल्याबद्दल श्री. देशमुख यांनी एसटी महामंडळाचे विशेष आभार मानून महामंडळाच्या सेवेबाबत कौतुक केले. आठ ते दहा तोळे सोने तसेच रोख रक्कम सुरक्षितपणे संबंधित प्रवाशाला परत मिळाल्याबददल वाहक लोहार व चालक घाडगे यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular