म्हसवड: वरकुटे-मलवडी येथे शेनवडी मार्गावरील शिंदे बुवा येथील साकव पूलावर सिमेंट मिक्सर ट्रक पलडी झाला असून गाडीचा चालक गंभीर जखमी झाला. रात्री उशिरा उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा -सोलापूर रस्त्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी सिमेंट मिक्सर ट्रक क्रमांक के.एA 29 बी 3806 हा कर्नाटकाहून शेनवडीकडून म्हसवडकडे येत होता. हा ट्रक वरकुटे – मलवडी येथे शेनवडी मार्गावरीलशिंदे बुवा येथील साकव पूलावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला.
या ट्रकच्या केबिनमध्ये चालक अशोक तनपुरे,रा.तनपुरे पो. खरसुंडी ता. आटपाडी जि. सांगली, हा सापडला. ट्रक सरळ करून चालकास बाजूला काढले. सुदैवाने तो वाचला होता. परंतु गंभीर जखमी झाला आहे.त्यास म्हसवड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
पाऊसाची रिप रिप सुरू असतानाही म्हसवड पोलीस हवालदार जाधव, शिंदे तसेच पोलीस पाटील धनंजय सोनवणे हे तातडीने अपघातस्थळी जाऊन पंचनामा करून जखमीस उपचारासाठी पाठविले.
सिमेंट मिक्सर ट्रक पलटी; चालक ठार
RELATED ARTICLES