Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीसपोनि तृप्ती सोनावणे यांची बदली झाल्याने नागरिकांच्यात समाधान

सपोनि तृप्ती सोनावणे यांची बदली झाल्याने नागरिकांच्यात समाधान

महाबळेश्‍वर ःपांचगणी येथील सहा पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांची बदली झाल्याने त्यांच्या कारभाराला कंटाळलेल्या तेथील अनेक जेष्ठ नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. कारण सोनावणे यांच्या काळात लॅण्ड माफियांच्या गुंडांनी मोठी दहशत निर्माण केली होती. तर मटका धंदयाला पुन्हा सुगीचे दिवस आले होते वाहतुकीची कोंडी सोडविण्याबाबतही सोनावणे या उदासिन होत्या. पांचगणी पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान नव्याने येणारे सहा पोलिस निरीक्षक बडवे यांच्या समोर असणार आहे .
राज्यातील नावाजलेले एक शैक्षणिक केंद्र म्हणुन पांचगणी या पर्यटन स्थळाची ओळख आहे. देश विदेशातील मुलां बरोबरच अनेक उदयोगपतींची व सिनेतारे तारकांची मुले येथे प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवतात. महाबळेश्‍वरपेक्षा या थंड हवेच्या ठिकाणची हवा अधिक अल्हाददायक असल्याने ब्रिटीश काळापासुन अनेक उदयोगपतींचे येथे बंगले आहेत. येथील जमिनीला सोन्याचा भाव असल्याने अनेक धनिकांच्या वारसांमध्ये या मिळकतींचे वाद सुरू झाले आहेत. मिळकतीचा ताबा असलेले मिळकती सोडण्यास तयार होत नाही. यामध्ये अनेक वर्षानुवर्षे रहात असलेले भाडेकरू यांचाही समावेश आहे. यातुनच मिळकतीचा ताबा मिळविण्यासाठी धनिकांनी येथे बळाचा वापर सुरू केला तर काही धनिकांनी लॅण्ड माफियांची मदत घेण्यास सुरूवात केली. लॅण्ड माफियांच्या विरोधात पांचगणी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल आहेत मागील आठवडयात असाच एक प्रकार पांचगणीमध्ये घडला रेशमी चौकात असलेल्या एक बंगला ताब्यात घेण्यासाठी वाई येथील लॅण्ड माफियांनी बंगल्या भोवती फिल्डींग लावली काही पुरूष व काही स्त्रियांंची नेमणुक करण्यात आली. येथे मोठे वाद होणार याची कल्पना आल्याने बंगल्यातील महीलांनी पांचगणी पोलिस ठाण्यात माहीती दिली परंतु नेहमी प्रमाणे पांचगणी पोलिसांनी दुर्लक्ष केले. दोन ते तीन दिवसांनी लॅण्ड माफियांनी बंगल्यातुन महीला बाहेर पडल्या नंतर बंगल्यातील नोकरास मारहाण करून तेथील त्यांचे साहीत्य बाहेर फेकुन बंगल्याची बेकायदेशीर ताबा घेतला. या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर पोलिसांनी या प्रकणाची फारसी दखल घेतली नाही. ज्यांनी बळाचा वापर केला त्यांचेवर किरकोळ गुन्हे दाखल करण्यात आले. असे अनेक प्रकार पांचगणी येथे घडत आहेत. या सर्व प्रकरणात पोलिसांची भुमिका कायम संशयास्पद राहीली आहे त्यामुळे पांचगणी पोलिसांची प्रतिमा डागाळलेली आहे.
शहरात काही वर्षापुवी मटका बंद होता परंतु तृप्ती सोनावणे येताच काही आठवडयात बंद मटका पुन्हा ओपन झाला. या साठी मटका व्यवसायिकांकडुन हप्ता डबल करण्यात आला होता. आता सोनावणे यांच्या कृपा छत्राखाली मटका व्यवसायास अच्छेदिन आले आहेत. पांचगणी शहरात वाहतुकीची कोंडीची समस्या कायम हंगामात डोके वर काढते. परंतु ही वाहतुकीची कोंडी सोडविण्याकडे सोनावणे यांनी कायम दुर्लक्ष केले होते.
या अशा कारभारामुळे पांचगणी येथील सर्वसमान्य नागरिकां प्रमाणे येथील जेष्ठ नागरीकांमध्ये तीव्र नाराजी होती.
आता नुकतीच सोनावणे यांची बदली झाल्याने सोनावणे यांच्या काभाराला कंटाळलेले नागरीक समाधान व्यक्त करीत आहेत. आता त्यांच्या जागी येत असलेले सहा पोलिस निरीक्षक बडवे यांच्या पुढे लॅण्ड माफियांची दहशत मोडुन काढण्या बरोबरच मटका व इतर अनैतिक धंदे उध्वस्त करण्याचे आव्हान असणार आहे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular