Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योगासने उपयुक्त: प्राचार्य गायकवाड

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योगासने उपयुक्त: प्राचार्य गायकवाड

फलटण: शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य विकसीत होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योगासने उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यानी नियमीत योगासने करावीत असे आवाहन प्राचार्य शेखर गायकवाड यांनी केले आहे. ईश्वर कृपा शिक्षण संस्था संचलित ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरे, ता. फलटण येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे होते. यावेळी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इयत्ता 1 ली ते 6वी च्या विद्यार्थ्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. शाळेतील क्रीडा शिक्षक कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रात्यक्षिके करुन दाखविली. यानंतर उपप्राचार्य सस्ते सर यांनी योगासने व प्राणायाम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व सर्वांनी नियमितपणे योगासने करण्याचा निश्चय केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular