साताराः सत्कर्म व जनसेवा करणे यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे. त्यासाठी बालपणापासून मुलांच्या मनावर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. स्तोत्रे, श्लोक, आरत्या. माउलींचे पसायदान यामधून ते घडत जातात. त्याला अतिशय उपयुक्त असे संस्कार धारा नित्यपाठ हे छोटेखानी पुस्तक संकलित करून डॉ अच्युत गोडबोले यांनी मोठेच सामाजिक कार्य केले आहे. असे उद्गार सज्जनगडच्या समर्थ सेवा मंडळाचे स. भ. योगेश बुवा रामदासी यांनी काढले.
संस्कार धारा नित्यपाठ या पुस्तकाच्या 5,00,000 व्या प्रतीच्या 50 व्या आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. पुस्तक मुले व पालक यांच्यापर्यंत पोचविणे फार अवघड असते. कौशिक प्रकाशन चे अरुण गोडबोले यांनी अतिशय जिद्दीने ते केल्यामुळेच व गेली 10 वर्षे केवळ रु. 10 एवढीच अल्प किंमत ठेवल्यानेच ते शक्य झाले , असेही ते पुढे म्हणाले..
आपल्या प्रास्ताविकात अरुण गोडबोले यांनी आम्ही हे काम केवळ समाजसेवा या भावनेने केले असे सांगून एकाद्या पुस्तकाच्या 50 आवृत्त्या निघणे व 5 लाख प्रती घराघरात पोचणे हा आधुनिक काळातील मराठी पुस्तकाचा बहुधा विक्रमच असेल असे मत व्यक्त केले.
या अनौपचारिक प्रकाशन समारंभ प्रसंगी डॉ अच्युत गोडबोले व मान्यवर हितचिंतक उपस्थित होते.
सफल जीवनासाठी संस्कार मोलाचेः स.भ.योगेशबुवा रामदासी
RELATED ARTICLES