Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीजीएसटीची साईट सरकारने जास्तीत जास्त रिटर्न भरता येईल अशा व्यवस्थेची करावीः सुबोध...

जीएसटीची साईट सरकारने जास्तीत जास्त रिटर्न भरता येईल अशा व्यवस्थेची करावीः सुबोध शहा

साताराः 1 जुलै 2017 पासून संपूर्ण देशात जीएसटी लागू करण्यात आला. आजपर्यंत या विषयावर मी 200 हून अधिक मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत. सरकारकडून रोज नियमात बदल होत आहेत. आपले टॅक्स रिटर्न भरताना सेटऑफ, आयटीसी घेताना कोणती काळजी घ्यायची व आपण घेतलेल्या रिटर्नचे सेटऑफ नियमानुसार पालन करून घेतले आहेत का हे पाहणेही तितकेच जरूरीचे आहे. वार्षिक रिटर्न भरण्यासाठी दोन महिने मुदतवाढ मिळाली ही गोष्ट निश्‍चितच स्वागतार्ह आहे. जीएसटीची साईट जास्तीत जास्त लोकांना रिटर्न भरण्यासाठी सहज व सोपी कशी होईल याकडे लक्ष देवून व्यवस्था करावी असे विचार ज्येष्ठ जीएसटी मार्गदर्शक सी. ए. सुबोध शहा यांनी केले.
सातारा येथील ज्येष्ठ करसल्लागार स्व.सी.व्ही.दोशी यांच्या तृतीय स्मृतीदिनी आयोजित जी. एस. टी. ची पुढील तयारी व नवीन जी. एस. टी. फोॅर्मस या विषयावर व्याख्यानात सुबोध शहा यांनी वरील उदगार काढले.
याप्रसंगी कराड अर्बन बँकेचे प्रमुख डॉ.सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, सी.ए.सुबोध शहा, सी.ए.अतुल दोशी, नगरवाचनालयाचे अध्यक्ष युवराज पवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सी.व्ही.दोशी यांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण केल्यानंतर सुबोध शहा यांचा सत्कार सुभाषराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतुल दोशी यांनी स्व.सी.व्ही.दोशी यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त हे व्याख्यान खर्‍या अर्थाने सातारकरांना जीएसटी विषयासाठी निश्‍चितच मार्गदर्शनपर ठरेल असे सांगितले.
यावेळी सी.व्ही.दोशी यांच्या विषयी आठवणी व्यक्त करताना युवराज पवार म्हणाले की, विविध संस्था उभी करताना सी.व्ही.नी मोठे कष्ट घेतले. निस्वार्थी वृत्तीने त्यांचे काम व स्मृती कायम स्मरणात राहतील. माजी विक्रीकर उपायुक्त अ‍ॅड.विनायकराव आगाशे यांनी सी.व्ही.हे जिद्दी होते. कधीही नोकरी न करता स्वतः प्रॅक्टीस केली. आज जीएसटीचे विषयावर हे मार्गदर्शन बहुमोलाचे ठरणार असल्याचे सांगून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. सतत कामात मग्न असणार्‍या सी.व्ही.नी कामाला प्रथम प्राधान्य दिल्याचे यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.
सी.ए.सुरेश कटारिया यांनी सी.व्ही.हे ज्येष्ठ करसल्लागार तर होतेच पण माझ्यासाठी वडिलांसारखे मार्गदर्शक होते. सामाजिक कार्याची त्यांना विशेष भान होते.
कराड अर्बन कुटूंबप्रमुख सुभाषराव जोशी यांनी कराड अर्बन बँक, सी.व्ही.दोशी यांचा हा स्मृतीदिन विशेष आनंदाने साजरा करताना त्यांना आवडणारी संबंधित विषयावरील व्याख्याने घेवून संपन्न करीत असल्याचे कौतूक वाटते. आज अतुल आणि सी.व्ही.चे विचार एकसमान येत असत.त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिलीप गुरव यांनी केले. समारंभास ज्येष्ठ उद्योजक बाबाशेठ तांबोळी, विजयराव आगटे, श्री राजपुरोहित,प्रमोद लाहोटी, राजा रानडे, मोहनशेठ देवी, श्रीमती दोशी, सौ.दर्शना दोशी,सुभाष दोशी, प्रवीण शहा, अरुण गुजर,प्रांजल दोशी, अशोक वाळिंबे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular