सातारा : सातारा शहर बागवान जमाततर्फे नुकत्याच शैक्षणिक वर्ष 2018-2019 मधील ई 10 वी आणि ई. 12 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करुन गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देवून सर्वस्तरांमधून तब्बल 70 उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांची नोंदणी झाली.
धन्वंतरी पतसंस्था हॉल, गुरुवार पेट सातारा येथे दिमाखदार कार्यक्रमात सातारा शहर बागवान जमाततर्फे आयोजित केलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. आफरिन मुलाणी (इनामदार) उपस्थित होत्या. रशिदभाई बागवान यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी प्रमुख पाहुणे, सातारा शहर बागवान जमात संस्थेचे अध्यक्ष परवेज बागवान, सचिव सलीम बागवान, खजिनदार फारुक बागवान, संचालक अब्दुल बागवान, संचालक नजिर बागवान, संचालक अकबर बागवान आदी पदाधिकारी तसेच सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक शकील बागवान व प. महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे सादिक शेख आदी मान्यवरांचा बागवान जमा शिक्षण कल्याण समितीच्या वतीने रोप देवून स्वागत करण्यात आले.
या नंतर इ. 10 वी मधील 49 व इ. 12 वी मधील 18 व तंत्रनिकेतन शाखेतील 3 अशा एकूण 70 विद्यार्थ्यांचा या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एक रोप, पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. या प्रसंगी 10 वी मधील कु. जैद बागवान 97.20, मिसबा बागवान 90.80, नाझ बागवान 85.40 तसेच 12 वी मधील कु. आयेश बागवान 74 या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बद्दल विशेष गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी जैद बागवान, साबिर बागवान व मिसबा बागवान भावूक झाले होते. यांनी आपले पालक, परमेश्वर व सातारा शहर बागवान जमातचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्या आफरीन मुलाणी यांनी आपल्या भाषणात अतिशय सूचक आणि मोजक्या शब्दात त्यांच्या महाविद्यालयीन शैक्षणिक प्रवास व महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलाखतीच्या अनुभवाचे कथन करुन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हा कार्यक्रम राबविल्याबद्दल गौरवोद्गार काढले. विशेष उपस्थिती सादिक शेख यांनी विद्यार्थ्यांसाठी असणार्या विविध शासकीय शैक्षणिक योजनांची माहिती देवून बागवान जमाततर्फे राबविण्यात येणार्या कार्यक्रमांचे कौतुक केले. शैक्षणिक समिती सदस्य साहिल बागबान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत मोबाईल व इंटरनेटच्या अती आहारी न जाता पुस्तकांशी मैत्री करण्याचा कानमंत्र दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात परवेज बागवान यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन बागवान जमाततर्फे येत्या काळात राबविण्यात येणार्या विविध कामांची माहिती दिली. साहिल बागवान यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातारा शहर बागवान जमात संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शैक्षणिक कल्याण समितीचे सदस्य अमजद बागवान, समिर बागवान, रईस बागवान, साहिल बागवान तसेच स्वयंसेवक तौफिक बागवान, जावेद पट्टेकरी, वसिम बागवान, शेरखान डांगे, इसरार ढगे, मुबिन शेख यांनी अथक परीश्रम घेतले. कार्यक्रमासाठी तौसिफ इनामदार, इंतेखाब बागवान, सातारा शहरातील मान्यवर व्यावसायीक सभासद पालक विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा शहर बागवान जमाततर्फे 70 विद्यार्थ्यांचा सत्कार
RELATED ARTICLES