सातारा: सातारा जिल्हयातील थोर परंपरा लाभलेल्या कराड नगरपरिषदेच्या विविध विकास कामांसाठी देवेंद्र फडणवीस यांचेकडे 280 कोटी रुपयांचा निधी मागीतला आहे. कराड नगरीच्या विकासाकरीता जास्तीत जास्त निधी देण्याकरीता सकारात्मक प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी ना. फडणवीस यांनी दिली आहे. निधी मिळेपर्यत आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत राहणार आहोत अशी माहीती सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
सातारा जिल्हयातील कराड नगरपरिषद एक आदर्श नगरपालिका आहे, या नगरपरिषदेमध्ये आजपर्यत ज्यांनी नेतृत्व केले आहे, त्या सर्वांनी स्व.यशवंतराव चव्हाण आणि स्व.पी.डी.पाटील साहेब यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार कार्य केले आहे. विकासाच्या कोणत्याही कामात येथील गट-तट विरोध करीत नाहीत अशी येथील परंपरा आहे, त्यामुळे कराड नगरपरिषद ब वर्ग नगरपरिषद असली तरी तीचा दबदबा राज्यामध्ये आहे, गतवेळच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कराड नगरपरिषदेने पहिला क्रमांक पटकावला होता, तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणारा वसुंधरा पुरस्कार यंदाच्या वर्षी कराड नगरीला मिळाला आहे. त्यामुळे अश्या नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या खालील कामांना निधीची मागणी नगरविकास मंत्री तथा मुख्य मंत्री म्हणून ना.श्री.देवेद्र फडणवीस यांचेकडे केली असल्याचे यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
1. कृष्णानदी वरील पूला पासून स्व.यशवंतराव चव्हाण समाथीस्थळ ते कोयना नदीवरील पूला पर्यंत नदी काठाने आरसीसी संरक्षक भिंत, रस्ता व त्यावरील पूल बांधणे- 175 कोटी रुपये 2. कराड नगरपरिषद मुळ शहरातील व नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील 51 रस्ते विकसीत करणे-80 कोटी रुपये 3. छत्रपती शिंवाजी महाराज स्टेडीयमची सुधारणा व अनुषंगीक कामे करणे- रुपये 11 कोटी 4. पेठ शुक्रवार पेंढारकर पुतळयापासून पश्चिमेस कोयना नदीकडे जाणा-या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे-2 कोटी 5. दुसरा सुधारित मंजूर विकास आराखडा आरक्षण क्रमांक 41(एस.टी.स्टॅन्ड नजीक) येथे मेकॅनिकल पार्किंग उभारणे रुपये 3 कोटी 6. दुसरा सुधारित मंजूर विकास आराखडा आरक्षण क्र.28 (भाजी मंडई लगत ) येथे मेकॅनिकल पार्किंग उभारणे रुपये 03 कोटी 7. नगरपरिषदेचा नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प व सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट (एस.टी.पी) करीता सौर उर्जा प्रकल्प उभारणे रुपये 4. कोटी 8. नगरपरिषद हद्यीमध्ये आवश्यक त्या ठिकाणी चार इंची डि.आय.वितरण नलिका टाकणे रुपये 2 कोटी
वरील कामे यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीचे गटनेते, आमचे निकटवर्तीय माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सुचवलेली आहेत. सदर कामांचे प्रस्ताव कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष यांनी, नुकत्याच रेठरे बुद्रूक येथे मुख्यमंत्री महोदय यांना सादर करण्यात आलेला आहे. त्याच प्रस्तावांना एकूण 280 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
सदरची कामे पूर्ण होईपर्यंत कराड नगरपरिषदेस लागेल ते सहकार्य केले जाईल, या प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा आमच्याकडून ज्या त्या वेळी केला जाईल तसेच कराड शहराच्या इतरही विकासकामांत योग्य सहकार्य व पाठपुरावा चालु आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे. निवेदनाव्दारे निधीची मागणी करताना, कराड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अॅड.डि.जी.बनकर, पवन निकम प्रमुख उपस्थित होते.
कराड नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे 280 कोटी रुपयांच्या निधीची मागणी
RELATED ARTICLES