रहिमतपूर : येथील शेरकर मळ्याकडे जाणार्या मार्गावरील कमंडलू नदीचे पात्र असल्यामुळे पावसाळ्यात लोकांना ये-जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता, ही बाब कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी उंच पूल व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न केले व तातडीने सर्वसाधारण साकव योजनेतून 34.81 लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
सदर पुलाचे काम निर्धारीत वेळेत व उत्कृष्ट दर्जाचे झाले असून, या पूलावरून सतत ये जा करावी लागणार्या शेरकर मळ्यातील महिला, शालेय विद्यार्थी यांनी आ. बाळासाहेब पाटील यांनी दिलेला शब्द पाळला व उंच पुलाचे कामास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
या पुलाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा शेरकर मळ्यातील महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल माने, रहिमतपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुलामुळे सदर मार्गावरील दळण वळण सुलभ होणार असल्याने व सदरचा पूल वाहतुकीस खुला झाल्याने संबंधित महिला, शालेय विद्यार्थी व शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले व आमदार बाळासाहेब पाटील यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी चाँदगणी आत्तार, नगरसेवक शशिकांत भोसले, सतीश भोसले, शिवराज माने, तानाजी राऊत, जितेंद्र माने, माजी नगरसेवक बंडेराव पवार, विक्रमसिंह माने, किसनराव राऊत, शशिकांत माने, विजय माने, सचिन कुंभार, अशोक घोलप, प्रा.भानुदास भोसले, दिलीपराव कदम, दिलीप भोसले, माजी चेअरमन विक्रम माने, विकास पवार, अनिल माने, जी.एच.माने, बलराम माने, अविनाश देशमुख, हिम्मत माने, अभय माने, किशोर भोसले हणमंतराव पवार, हणमंतराव भोसले, सुभाष यादव, भिकू पवार, एस.के.माने, दिलीप कदम(आबा), प्रल्हाद शेरकर, अंकुशराव माने, भोसले सर, शेखर पाटणे, दत्तात्रय जेधे, आबासाहेब मोटे, जगन्नाथ माने, धनंजय सूर्यवंशी, सुनील माने, राजेंद्र जाधव, कल्याण चव्हाण, बेदिल माने, राजू कदम, बाजीराव घोलप, जनार्दन काशीद, संदीप माने, बळीराम माने, लहुराज माने, गुलाबराव वामनराव माने, शिवाजीराव मानसिंगराव माने, संभाजी माने तसेच पंचक्रोशीतील नागरीक-ग्रामस्थ, महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रहिमतपूर येथील शेरकर मळ्यातील उंच पुलाचे उदघाटन संपन्न
RELATED ARTICLES