सातारा : शेळी गट वाटप योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून पशुपालकांनी दि.20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अंकुश परिहार यांनी केले आहे.
ही योजना जिल्ह्यामध्ये सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार असून अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसर्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के या प्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजेनेंतर्गत शेळ्यांचा वाडा बांधकामासाठी व मोकळी जागा मिळून किमान 2 हजार चौ. फुट स्वत:ची जमिन लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. योजनेंतर्गत एका शेळी गटाची किंमत रुपये 2 लाख 29 हजार 400 इतकी असून 50 टक्के अनुदानित किंमत रुपये 1 लाख 14 हजार 700 निवड झालेल्या लाभार्थ्यांस देय असणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन परिहार यांनी केले आहे.
गट योजना लाभासाठी पशुपालकांनी अर्ज करण्याचे आवाहन
RELATED ARTICLES