फलटण (अशोक भोसले): माऊलीचा पालखी सोहळा तोंडावर आलेला असतानाही फलटण तालुक्यात तरडगाव, फलटण, बरड या तीन ठिकाणी लाखो वारकर्यांसह भाविक भक्त माऊली यांचा पालखी सोहळा विसावण्यासाठी येत असतो मात्र त्याच्यासाठी पुरवण्यात येणार्या सोयी सुविधाचा फज्जा उडाला असून आज बुधवार दि 26 रोजी झालेल्या आढावा बैठकीला अनेकांनी दांडी मारून तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करून बैठकीला न येणे पसंत केल्याने माऊलींचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडणे अवघड झाले असून येणारा माऊली सोहळा तहसीलदार पाटील यांच्या आडमुठ्या भूमिकेने महसूल च्या लाल फितीत अडकला आहे.
काल दि. 25 रोजी माऊलीचा पालखी सोहळ्याने आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दरवर्षी पालखी प्रस्थान होण्यापूर्वी फलटण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळा आढावा व नियोजन बैठक आयोजित करण्यात येते या बैठकीला सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायती सदस्य, पोलीस पाटील उपस्थित असतात.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात तरडगाव, फलटण व बरड या तीन ठिकाणी पालखी मुक्काम असतो या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित असतात दरवर्षी पालखी प्रस्थाना पूर्वी सर्व पालखी तळ, विसावा ठिकाण, पालखी येणार्या रस्त्याची, पिण्याच्या पाणीसाठा ठिकाण व ईतर बाबींची पहाणी जिल्हाधिकारी व आळंदी पालखी सोहळा कमिटी करतात परंतु यावर्षी दि 25 रोजी माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होऊनही महसुल प्रशासनाने पालखी सोहळा नियोजन गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही.या मुळे आज (बुधवारी)झालेल्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला अनेकांणी दांडी मारली होती.
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, पालखी तळावर व विसावा ठिकाणी स्वच्छता, पालखी सोहळा मुक्काम ठिकाणी महावितरण वीज पोल वरून गेलेल्या धोकादायक खाजगी केबल, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यावर झालेले अतिक्रमणे, रस्त्यावर पडलेल्या चरी, लोंबकळत असणार्या वीज लाईन, धोकादायक झाडे, वीज दिवे, वीज चोरी, नदी नाले यांची अस्वच्छता, पाणी पुरवठा, फलटण शहरात भुयारी गटर योजनेमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, पालखी सोहळा मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीना वाढीव निधी देणे याबाबत आज अखेर परिस्थिती फारच खराब असून दि 26 रोजी तहसील कार्यालय फलटण येथे अंत्यत खाजगी पध्दतीने आढावा व नियोजन बैठक पार पडली.
फलटण तहसीलदार हनुमंत पाटील यांनी बहुतेक पालखी सोहळ्याची असणारी जबाबदारीची भूमिका त्याची काम करण्याची पद्धत पहात गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. अनेक मागण्या तहसीलदार हनुमंत पाटील यांनी झिडकारून लावल्याने तालुक्यात कमालीची नाराजी पसरली आहे.
दरवर्षी मोठ्या भवनात भरवण्यात येणारी बैठक तहसीलदार फलटण यांच्या छोट्या कार्यालयात पार पडली या बैठकीत मोजक्याच लोकांना माहिती देण्यात आली होती आजअखेर पालखी सोहळ्याची जबाबदारी पार पाडत असताना सर्व शासकीय विभाग यांना पालखी सोहळा प्रस्थान होण्यापूर्वी सर्व प्रकारच्या व्यवस्थेकडे अंत्यत काळजीपूर्वक पाहीले जात होते.
परंतु यावर्षी पालखीचे नियोजन बाबत महसूल विभागाचे कामकाज पहाता अनेक त्रुटी राहणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यात सुरू आहे. मागील वर्षी नियोजनाच्या अभावामुळे फलटण येथील विमानतळ येथे दोन वारकर्यांचा विजेच्या धक्याने जीव गमवावा लागला होता.
यावर्षी कोणत्याही प्रकारे नियोजन न केल्याने पालखी सोहळा नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
माऊलीचा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये सुविधांचा उडालाय फज्जा
RELATED ARTICLES