Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीऔंध येथील एटीएम सेंटर्स बनली शोपीस; पैशाचा ठणठणाट अनियमित सेवेमुळे एटीएम ग्राहकांमधून...

औंध येथील एटीएम सेंटर्स बनली शोपीस; पैशाचा ठणठणाट अनियमित सेवेमुळे एटीएम ग्राहकांमधून तीव्र संताप

औंध: औंध येथील राष्ट्रीयकूत बँकेची दोन एटीएम सेंटर्स असून अडचण नसून खोळंबा बनली आहेत. वारंवार बंद पडणार्या एटीएम सेंटरमुळे व पैशाच्या तुटवडयामुळे औंध परिसरातील अनेक गावांमधील तसेच भाविक, पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून कोणत्याही एटीएम मध्ये नियमित पैसे टाकले जात नसल्याने हेलपाटे मारून एटीएम ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत संबंधित यंत्रणेने त्वरित लक्ष घालून एटीएम ग्राहक, पर्यटक,भाविकांना तत्पर सुविधा देण्याची मागणी औंध ग्रामस्थांमधून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,औंध येथील पोलीस स्टेशननजीक एक एटीएम सेंटर आहे तर गावातील एका बँकेजवळ दुसरे एटीएम सेंटर आहे .पोलीस स्टेशननजीकचे एटीएम सेंटर कायमस्वरूपी बंद पडलेले असते तसेच याठिकाणी असणारी एसी सुविधा बंद पडलेली आहे तसेच येथील येथील एटीएम मशिन ही नीट काम करीत नाही त्यामुळे पैसे अडकणे ,नुसते मँसेज येणे असे प्रकार ही घडत आहेत. परंतु बर्याचवेळा याठिकाणी पैसेच उपलब्ध नसतात तसेच एटीएम सेंटरमध्ये लाईटची म्हणावी तशी सुविधा नाही ,सिक्युरिटी सुविधा नाही अशी अवस्था आहे बर्याच वेळा संबधित बँकाकडे तक्रार करून ही आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असे बँक प्रशासनाकडून सांगितले जाते. तिच अवस्था दुसर्‍या एटीएम सेंटरची असून त्यामुळे तीन ते चार दिवसातून एकदाच पैसे एटीएम सेंटरमध्ये टाकले जातात मात्र काही तासात ते संपून जातात
.त्यामुळे दोन्ही एटीएम सेंटर्समध्ये कायम खडखडाट आढळून येत असल्याने औंध येथे नियमित येणारे भाविक, पर्यटक, पंचक्रोशीतील शेकडो एटीएमधारकांना एटीएम सेंटरमध्ये पैसे उपलब्ध होत नसल्याने वारंवार मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे .
याबाबत संबंधित यंत्रणा व बँक प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून चांगल्या सुविधा देण्याची मागणी ग्राहकवर्गातून केली जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular