Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीनव्या पिढीच भवितव्य घडविणारा पाटण शुगर केन :- विक्रमसिंह पाटणकर.

नव्या पिढीच भवितव्य घडविणारा पाटण शुगर केन :- विक्रमसिंह पाटणकर.

पाटण:- पाटण तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या मनातल्या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना मनस्वी आनंद होत आहे. नव्या पिढीचे भवितव्य घडविणारा पाटण शुगर केन कारखाना असुन हा कारखाना शेतकऱ्यांच्या कष्टाचे चिज केल्याशिवाय राहणार नाही. या कारखान्याच्या माध्यमातून ऊसाच्या रसापासून ते साखरेपासून जी जी उत्पादने करता येतील ती सर्व केली जाणार आहेत. तसेच कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस लागन ते ऊसतोड पर्यंत जेवढ्या सवलती देता येतील तेवढ्या देण्यात येणार आहेत. हा कारखाना प्रदूषण मुक्त असून पाटणकरांनी ऐखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले की तो प्रकल्प उभा झाल्याशिवाय राहत नाही. या कारखान्याच्या ८०% मशनरी कारखाना भूमिपूजन अगोदरच खरेदी झाल्या असून प्रत्यक्षात कारखाना सुरू झाल्यावर शेजारच्या कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा दर देण्याचा प्रयत्न पहिल्या वर्षांपासून केला जाणार असून पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती पूर्ण करणार असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण शुगर केन भूमिपूजन प्रसंगी सांगितले.

कातवडी, मेष्टेवाडी, कवडेवाडी आणि पिपंळोशीच्या सरहद्दीवर पाटण शुगर केन कारखान्याचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, जि.प. सदस्य रमेश पाटील, बापुराव जाधव सुजित पाटील, पाटण प.स. सभापती उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, कौम्रेड पी.डी.पाटील,अॅड. अविनाश जानुगडे, दादासाहेब यादव, संजय चव्हाण, विलासराव शिरसागर, शंकरराव जाधव, दिनकरराव घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विक्रमसिंह पाटणकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले. या कारखान्यातून साखर बाहेर पडेपर्यंत कष्टाची पराकष्टा करावी लागणार आहे. पहिली गोष्ट या कारखान्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन राखले जाणार आहे. तसेच साखरेपासून आणि ऊसापासुन निर्माण होणारे सर्व पदार्थ निर्माण करण्याचा प्रयत्न पाटण शुगर केन मधून केला जाणार आहे. ऊस तोडल्यापासून १० तासाच्या आत ऊसाचे गाळप केले जाणार असुन शेअर प्रमाणात ऊस गाळप केल्यास सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल. या कारखान्याचा वापर पाटण तालुक्यातील शेतकरी सम्रुध्द करण्यासाठीच केला जाणार आहे. असे शेवटी त्यांनी सांगितले.

* कारखान्यातुन काहिही काढू पण तुमच्या पेक्षा जादा
दर देऊ – सत्यजितसिंह पाटणकर.*

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले चांगल्या प्रकल्पाला सुरवात करताना पाटण तालुक्यात येणारा पाऊस हे चांगलेच संकेत आहेत. यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना होणारा आनंद व्दिगुणीत आहे. आदरणीय दादांनी १९८३ सालापासुन पाटण तालुक्याला घडविण्याचे काम केले. यात विकास कामापासून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले. पाटण तालुक्यात शुगर केन चे भूमिपूजन म्हणजे नवीन क्रांतीची सुरवात आहे. असे सांगून सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले विरोधकांनी प्रत्येक चांगल्या कामात, प्रकल्पात, गोष्टीत विरोध केला. दादांनी चांगले काही केल्याल्याच त्यांना कधी चांगले दिसलच नाही. पाटण तालुक्यात जे काही चांगले होईल ते मीच केले अस म्हणन्याची सवय त्यांची वाढली आहे. कुठलही काम चांगले असलेकी ते मीच केलय अन्यथा त्यांचा विरोध अशी फसवी भूमिका त्यांची राहीली आहे. अशा फसव्या भूमिकेला पाटण तालुक्यातील जनता कंटाळली आहे. असे सांगून सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले दादांच एक मार्गदर्शन आहे. खोटे काही करायचे नाही. होणार असेल तरच करायचे. या तत्वावर चालुन पाटण शुगर केन ची उभारणी होत आहे. असे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी सारंगबाबा पाटील, बाबुराव सुतार, राजाभाऊ शेलार, शंकर शेडगे, सदाभाऊ जाधव यांनी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमाला पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट – * पुन्हा ऐकदा साखर कारखान्याच्या
भुमिपूजनाची संधी *
५६ वर्षापूर्वी बाळासाहेब देसाई साखर कारखाना उभारणी वेळी या कारखान्याच्या भुमिपुजन प्रसंगी बाळासाहेब देसाई यांच्याबरोबर भुमिपुजन करण्याची संधी मला मिळाली होती. आता देसाई कारखाना पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित पहात नाही म्हणून ५६ वर्षानंतर पुन्हा ऐकदा साखर कारखान्याच्या भुमिपूजनाची संधी मला मिळाली. असे विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या भाषणात आवर्जून जुनी आठवण सांगितली.

 

चौकट – *पाटण शुगर मधून काहिही निर्मिती करू पण
देसाई कारखान्यापेक्षा जादा दर शेतकऱ्यांना देऊ.*

पाटण शुगर केन कारखान्याची मशनरी खरेदी भूमिपूजन अगोदरच झाली आहे. येत्या ८ ते ९ महिन्यात कारखाना स्ट्राईल शिजन सुरू करेल. या कारखान्यातुन साखर, गुळ पावडर, साखर जन्य पदार्थांची निर्मिती काहिही काढू पण शेतकऱ्यांना तुमच्या पेक्षा जादा दर देऊ. असे शेवटी शंभुराज देसाईंना टोला मारताना सत्यजितसिंह पाटणकर यांनी सांगितले असता उपस्थित शेतकऱ्यांच्यात ऐकच जल्लोष झाला.

पाटण शुगर केनच्या भुमिपूजनाची क्रेझ सोशल मीडियावर

उभ्या पाऊसात गर्दीचा उंचाक*

पाटण शुगर केन कारखान्याच्या भुमिपूजनाचे पोश्टर अवघ्या आठ दिवसापूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. तेंव्हा पासून ते पोश्टर सोशल मीडियावर सतत जळकत होते. पाऊसामुळे आणि शेतीतल्या कामामुळे गर्दी होईल का शंका होती. मात्र कार्यक्रमाला घातलेला मंडप अपुरा पडला उभ्या पाऊसात देखील कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular