Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीसातारा-जावली मतदारसंघातील 21 कामांसाठी 1 कोटी 87 लाख

सातारा-जावली मतदारसंघातील 21 कामांसाठी 1 कोटी 87 लाख

सातारा : आमदार फंड, जिल्हा नियोजन समिती यासह राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला असतानाच त्यांनी आता कोयना भुकंप निधी समितीमधुन सातारा- जावली मतदारसंघातील 21 कामांना तब्बल 1 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे. कोयना भुकंप निधी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या कामांसाठी निधी मंजूर केला आहे.
कोयना भुकंप निधी समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्याच्या निधी वाटपाबाबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभुराज देसाई, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे आदी मान्यवर आणि संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जावलीतील विविध विकासकामांची यादी सादर करुन यासाठी त्वरीत निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी केली.
त्यांच्या मागणीनुसार सातारा तालुक्यातील 5 कामांसाठी 41 लाख आणि जावली तालुक्यातील 16 विकासकामांना 1 कोटी 46 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा तालुक्यातील काळोशी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), गवडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (7 लाख), पोगरवाडी येथील रंगुबाईचीवाडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (7 लाख), झरेवाडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (7 लाख) आणि कुस बु. येथे सभामंडप बांधणे (10 लाख) या कामांचा समावेश आहे.
जावली तालुक्यातील आपटी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), आपटी हात्रेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), पावसेवाडी पोहोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख), उंबरी गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), मुनावळे गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), म्हावशी येथील पाणीपुरवठा योजनेकरिता पाईपलाईन करणे (10 लाख), आंबेघर मेसाचीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लाख), केडंबे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (10 लाख), कुसुंबी येथे हायस्कूल शाळा खोली बांधणे (7 लाख), नांदगणे ते पुनवडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), मोहाट येथे सभामंडप बांधणे (8 लाख), सावली ते म्हाते रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (15 लाख), गवडी येथील मधलीवाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख), करंडी गावाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (8 लाख), सावली येथे रस्त्याखालील वाडीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (3 लाख) आणि केळघर येथील महादेव मंदीर ते मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (5 लाख) ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून सातत्याने मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लागत असून सर्वप्रकारचे प्रश्‍न सुटत असल्याने मतदारसंघातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular