पाटण:- कोयना धरणाच्या बांधकामावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी बांधकाम पाहणी साठी कोयना येथे १९६५ साली भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या हस्ते कोनशिला अनावर झाले होते. त्यानंतर कोणी तिकडे फिरकत नव्हते. १९६५ ते १९८६ सालापर्यंत हि कोनशिला उघड्यावर होती. पंडित जवाहरलाल नेहरु यांची आठवण म्हणून नेहरू गार्डन ची संकल्पना उभी राहिली. आज ह्या गार्डनकडे पंडित जवाहरलाल नेहरु यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून पाहिले जाते. या नेहरु गार्डन मुळेच कोयना पर्यटन वाढीस आले. पाटण तालुक्याचे कोयना पर्यटन हे भांडवल असून याचा जास्तीत जास्त उध्दोग व्यवसाय वाल्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. असे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटण येथे नव्याने सुरु झालेल्या होटेल शिवराज च्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
यावेळी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर, पाटणचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, म्हावशी गावचे सरपंच शंकर घाडगे, यशवंतराव जगताप, उध्दोजक दत्तात्रय पडवळ, राजाभाऊ काळे, गोरख नारकर, प्राणलाल माने, विठ्ठलराव यादव, धर्यशिल पाटणकर, चंद्रकांत मोरे, संजय इंगवले, नितीन पिसाळ, विजय थोरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बोलताना विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले आजच्या काळात प्रतेकाला नोकऱ्या लागणे शक्य नाही. नोकऱ्यांना लिमीट असते. मात्र उद्योग व्यवसायांना लिमीट नाही. छोट्या उद्योगातुन माणसे मोठी झाली आहेत. उद्योग व्यवसायातुन अनुभव पाठीशी येतो. चांगली गोष्ट बघितली तर ती करण्याची जिद्द पाहिजे. तर कष्ट करणाऱ्याला नेहमी यश येते. होटेल व्यवसायात कौलिटीला ऐडजेस्टमेंट करु नका. यश तुमच्या जवळच आहे. असे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी शरद काटकर म्हणाले पाटण तालुक्याला निसर्गाचे वरदान आहे. याचा फायदा येथील स्थानिकांनी प्रथम घेतला पाहिजे. पाटण तालुक्यातील पर्यटन वाढले तर येथे व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेऊन व्यवसायत उतरा. तो चिकाटीने करा. व्यवसाय हा व्यवसाय असतो. कष्ट केल्याशिवाय प्रगती नाही. प्रगतीसाठी राबणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात व्यवसायात प्रामाणिकपणा पाहिजे. मग व्यवसाय कोणताही असो तो मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगून ते म्हणाले आजचे शिक्षण नोकरी साठी नको तर ते व्यवसायीक हवे.
यावेळी इतर मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी व्यवसायिक शिवराज होटेल चे मालक राजेंद्र पाटणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. बकाजीराव निकम यांनी प्रस्ताविक करुन सुत्रसंचालन केले. या शिवराज होटेल उद्घाटन कार्यक्रमास दिलीपराव मोठे, वैभव पाटणकर, लक्ष्मण चव्हाण, शंकर पाटील, प्रदिप पाटणकर, मंगेश पाटणकर, नामदेव कुंभार, काशिनाथ विभुत्ते, महादेव खैरमोडे, सुभाष शिर्के, यांच्यासह पाटण – म्हावशी येथील ग्रामस्थ पाटणकर कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राजेंद्र पाटणकर यांनी सर्वांचे आभार मानले.