भुईंज ः पश्चिम महाराष्ट्राला साजेल असं भाजप सदस्य नोंदणीचे अभियान सर्वाधिक संख्येने वाई-खंडाळा-मश्वर या विधानसभा मतदार संघात असेल असा विश्वास व्यक्त करीत भाजपाच्या केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कामकाजामुळं सर्वत्र उत्साही वातावरण असून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळं सर्वत्र नवचैतन्य, नवा विश्वास पहायला मिळतोय. याच वातावरणात होत असणारी सदस्य नोंदणी विक्रमी करण्याचा संकल्प आमचा आहे असे आश्वासक उद्गार किसनवीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले. भुईंज, ता.वाई येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ दिमाखात करण्यात आला. यावेळी भाजपाचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक, रविजी अनासपुरे, भाजप प्रदेश प्रतिनिधी अविनाश फरांदे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अभियान प्रमुख अनुप सुर्यवंशी, प्रतागड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, भाजपनेते अनिल जाधव, वाई तालुकाध्यक्ष सचिन घाटगे, खंडाळा तालुकाध्यक्ष राहूल हाडके, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष तानाजी भिलारे, वाईच्या नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मदनदादा भोसले म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीसाठी मिळत असलेला प्रतिसाद हा उद्याच्या येणार्या भवितव्याला वेगळी दिशा देणारा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मिळालेला प्रतिसाद हा त्याचे बोलके उदाहरण आहे. मी निमित्त असेन पण आदरणिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने उभी केलेली ही जनमाणसातील विकासाची चळवळ मूर्त स्वरूप घेऊन खर्या अर्थाने यशाच्या शिखरावर पोहोचलेली आहे. मी माझे सर्व सहकारी कार्यकर्ते या अभियानातून पश्चिम महाराष्ट्राला साजेल अशी सदस्य नोंदणी विक्रमी संख्या उभी करण्याचा प्रयत्न माझा आहे, असा विश्वास व्यक्त करत येणार्या वाई-खंडाळा-मश्वर विधानसभा मतदार संघात नवे भवितव्य दिसेल असाही विश्वास व्यक्त केला. भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी यावेळी सांगीतले की, आम्ही मदनदादा भोसले यांच्याकडे खूप मोठ्या अपेक्षा घेऊन आहोत, सदस्य नोंदणीचे त्यांनी सुरू केलेले हे संघटनात्मक काम पक्षाला या मतदार संघात जनमत मिळवून देण्याबरोबरच उभारी देण्याचे कामही करणारे आहे. याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदार संघात सेनेच्या उमेदवाराला दुसर्या क्रमांकाची मते तर जिल्ह्यात हा मतदार संघ याचबाबतीत तिसर्या क्रमांकावर आहे. जर भाजपाचा उमेदवार लोकसभेकरीता असता तर चित्र वेगळे बघण्यास मिळाले असते असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्व.शामा प्रसाद मुखर्जी, स्व.अटलबिहारी वाजपेयी, पं.दीनदयाळ शर्मा यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत मदनदादा भोसले यांनी केले. या अभियानास मधुकर बिरामणे, वाई शहराध्यक्ष अजित वनारसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, भैय्यासाहेब जाधवराव, महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सतीश भोसले, रोहिदास पिसाळ, राजेंद्र शेवते, शशिकांत दगडेे, पै.मधुकर शिंदे, प्रविण जगताप, जयवंत पवार, मोहनराव ऊर्फ आबासाहेब भोसले, गजानन भोसले, भुईंज सरपंच पुष्पा भोसले, पाचवड सरपंच अर्चना विसापुरे यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक यशवंतराव लेले यांनी केले तर आभार सचिन घाटगे यांनी मानले. सूत्रसंचालन जयवंत पिसाळ यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्राला साजेल असं भाजप सदस्य नोंदणीचे अभियान राबविणार ः मदन भोसले
RELATED ARTICLES