Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीटाटा कमिन्स कंपनीच्या सुपरवायझरला बेदम मारहाण

टाटा कमिन्स कंपनीच्या सुपरवायझरला बेदम मारहाण

तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल
फलटण : टाटा कमिन्स कंपनीच्या सुपर वायझरला राहत्या घरी पार्किंगमध्ये तीन अज्ञात इसमानी बेदम मारहाण केल्याची घटना फलटण येथे घडली असून सध्या मारहाण झालेल्या सुपर वायझरवरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत फलटण शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाचा पुढील तपास होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 12 जुलै 2019 रोजी प्रशांतकुमार कार्तिक चंद्र जैना वय – 32 वर्ष, व्यवसाय – नोकरी, टाटा कमिन्स कंपनी सुरवडी मुळ राहणार सदानंदपुर जि. बालेश्वर राज्य ओरिसा, हल्ली रा. -406 हडको कॉलनी फलटण ता. फलटण जि. सातारा फिर्यादी यांना नेहमीप्रमाणे माझी सकाळी 9 ते सायं. 5.30 वा. चे पर्यत ड्युटी असल्याने सकाळी 8. 30 वा. मोटार सायकल नं. ॠक 05 न 9083 हिचेवरुन सकाळी कंपनीत ड्युटीकरीता गेले त्यावर दिवसभर ते ड्युटीवर होते व सायं. 5.30 वा. ड्युटीवरुन सुटल्यानंतर सायं. 6.40 वा. चे सुमारास रहात असल्याठिकाणी आले असता गाडी गेटमधुन आत घेवुन पार्किंगमध्ये पार्किंग करीत असताना पाठीमागुन गेटमधुन कोणीतरी तीन इसम त्यांचे तोडास कपडा बांधलेले पाठीमागुन आले व त्यांनी काही एक न विचारता त्यांचे हातातील केबलचे काळ्या रंगाचे वायरने जैना यांच्या डोक्यात तसेच डाव्या हातावर मारहाण करु लागले त्यावर त्यांनी मारहाण करणार्‍याना तुम्ही लोक का मारहाण करीत आहात असे विचारले असता त्यांनी तु कंपनीत सुपरवाझरचे काम करतो म्हणून काहीही करणार का असे म्हणुन त्या तीन अज्ञात इसमानी केबलचे वायरने मारहाण केली.
यावेळी जैना यांनी मोठ्याने त्यांचा मित्र राकेश यास आवाज दिल्याने तो रुममधुन धावत आला. त्यावर ते तिघेही अज्ञात मारहाण करणारे इसम तेथुन पळुन गेले व ते अज्ञात मारहाण करणारे इसम कोण होते ते जैना यांना समजले नाही.यानंतर फिर्यादी यांचा मित्र राकेश यांच्या मोटार सायकल वरती फलटण शहर पोलीस ठाण्यात घेवुन गेले व तेथुन उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular