भोपाळ : कर्नाटकमध्ये काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपाकडून मध्य प्रदेशमध्येही राजकीय नाट्य घडविले जाईल अशी चर्चा रंगली आहे. भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडीत लवकरच उलथापालथ होईल असे अनेकवेळा म्हटले आहे. मात्र आज, बुधवारी मध्य प्रशमधील राजकीय समीकरणे चुकल्याचे चित्र आहे. एका बाजूला भाजपाकडून काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच दुस-या बाजूला एक वेगळीच राजकीय घटना घडल्याचे समोर आले आहे. बुधवारी मध्य प्रदेश विधानसभेत एका विधेयकावर मतदान प्रक्रिया होत असताना भाजपाच्या दोन आमदारांनी कमलनाथ सरकारच्या समर्थनार्थ मतदान केले आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे.
विधेयकाच्या बाजूने मतदान करणा-यांमध्ये भाजपाचे शरद कोल आणि नारायण त्रिपाठी यांचा समावेश आहे. कोल हे शहडोल जिल्ह्यातील ब्यौहारीतून तर, त्रिपाठी हे सतना जिल्यातील मेहरमधून निवडून आले आहेत. मतदानानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, भाजपा म्हणते की, आमचे (काँग्रेस) सरकार अल्पमतात असून लवकरच हे सरकार पडेल. आज विधानसभेत गुन्हेगारी दुरुस्ती विधेयकावर मतदान झाले. यावेळी भाजपाच्या दोन आमदारांनी विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केले.
गुन्हेगारी दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीसाठी बीएसपीचे आमदार संजीव सिंह यांनी मत विभाजनाची मागणी केली. या मागणीला सभापती यांनी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत विधेयकाच्या बाजूने 122 मते मिळाली. (पान 6 वर) बाजपाने मत विभाजनात भाग घेतला नसल्याने विधेयकाच्या विरोधात एकही मत पडले नाही. मात्र, भाजपाच्या दोन आमदारांनी विधेयकाच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. तत्पूर्वी, राजकीय वर्तुळात कर्नाटकातील कमळ ऑपरेशन यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील सरकार पडले तर त्याची जबाबदारी आमची नाही, असे सुचक वक्तव्य केले होते. तसेच, भाजपा नेते आणि मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी कमलनाथ यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला होता की, आम्हाला पक्षातील एक किंवा दोन क्रमांकाच्या नेत्यांचा आदेश आला, तर 24 तास सुद्धा लागणार नाहीत तुमचे (काँग्रेस) सरकार पाडायला, अशी प्रतिक्रिया दिली होती.
मध्य प्रदेशात भाजपा आमदारांची काँग्रेसला साथ
RELATED ARTICLES