Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडी83 टि.एम.सी. च्या पुढे कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाणी सोडणार- प्रांत...

83 टि.एम.सी. च्या पुढे कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाणी सोडणार- प्रांत श्रीरंग तांबे.

कोयना धरणाचा पाणी साठा 80.85 टि.एम.सी.
पाटण :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाची सततधार सलग सातव्या दिवशी सुरूच असून पाणी साठा रात्री 9 वाजता 80.85 टि.एम.सी. झाला आहे. सततधार होत असलेल्या पाऊसाने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज गुरवारी सकाळी 9 वा. सुमारास धरण पायथा विज निर्मिती ग्रुहातून 2100 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पाऊसाचा अंदाज घेत व धरणात येणार्‍या पाण्याची जादाची आवक पहाता 83 टि.एम.सी. च्या पुढे वरील सहा वक्र दरवाजातून केंव्हाही पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. असे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी सांगितले. सद्या धरणात प्रतिसेकंद 39,113 क्युसेस पाण्याची आवक सुरु आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण कायम असून सद्या धरणात येणार्‍या पाण्याची आवक प्रतिसेकंद 39,113 क्युसेस आहे. धरण सद्या 80.22 टि.एम.सी. भरले आहे. पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पायथा विज निर्मिती ग्रुहातुन 2100 क्युसेस पाणी सोडण्यास गुरवार सकाळी 9 वा. पासून सुरवात केली आहे. कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी 25 टि.एम.सी. पाण्याची आवश्यकता आहे. मात्र धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणात येणार्‍या पाण्याची आवक पहाता पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी 83 टि.एम.सी.च्या पुढे धरणाच्या वरील सहा वक्रदरवाज्यातुन पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोयना नदीला पुर परस्थितीत निर्माण होणार नाही. याची दक्षता धरण व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणेने घेतली असुन तरी देखील कोयना नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पत्रकार शंकर मोहिते यांच्याशी बोलताना सांगितले.
कोयना धरणाची पाणी पातळी- 2142.06 फूट, 652 .704 मीटर तर पाणी साठा- 80.22 टि.एम.सी. झाला आहे. धरणात येणार्‍या पाण्याची आवक- 39,113 क्युसेस आहे. तर गुरवार सकाळी 8 वा. ते सायंकाळी 5 वा. पर्यंत या नऊ तासात कोयना- 75 मि.मी. (एकुण- 3397 मि.मी.), नवजा- 56 मि.मी. (एकुण- 3938 मि.मी.), महाबळेश्वर- 98 मि.मी. (एकूण- 3406 मि.मी.) इतकी नोंद झाली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular