पाटण:- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊसाने कोयना धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून आज सकाळी साडेसहा वाजता धरणातील पाणी साठा ९४ टि.एम.सी. झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ९४ हजार क्युसेस इतकी वाढली आहे. कोयना नदी पुर परस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी आज सकाळी ९ वाजता कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे तीन फुटावरुन साडेसहा फुटावर उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे कोयना नदीपात्रात पाण्याचा येणारा विसर्ग प्रतिसेकंद ४१,१३६ क्युसेस असणार आहे. सतत पडणारा पाऊस आणि धरणातील सोडलेले पाणी यामुळे कोयना नदीपात्रातील पाण्यात देखील झपाट्याने वाढ होऊन पुरपरस्थिती निर्माण होत आहे. अशा परस्थितीत कोणीही नदीपात्रात उतरु नये. तर कोयना-क्रुष्णा नदी काठावरील गावांनी सतर्क राहवे. असे कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी कुमार पाटील यांनी केले आहे.
अतिरिक्त पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने कोयना नदीला पुरपरस्थिती निर्माण झाली असून हेळवाक पासून नदीकाठावरील सर्व गावांनी सतर्क राहवे. या पुर परस्थितीत पाटण जवळील मुळगाव पुल पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता असुन नवीन पंचायत समिती इमारत पाठीमागील बाजू, रामापुर, एस.टी.स्टैंड परिसरातील नागरीकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे पाऊसाचे प्रमाण वाढते राहिल्यास कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. तरी नागरीकांनी सतर्क राहवे असे अहवान करण्यात आले आहे.
*कोयना धरण*
दि. 04/08/2019
06.00 AM
पाणीसाठा 93.87 tmc
पाऊस mm
•कोयना 179
• नवजा 182
•महाबळेश्वर- 228
एकूण विसर्ग 19580 cusecs
आवक 94000 cusecs
सकाळी 9.00 वाजता विसर्गात वाढ होणार आहे.
6 वक्रद्वारे साडेसहा फूट उचलून सांडव्यावरून 39036 cusecs व विजगृहातून 2100 cusecs असा एकूण विसर्ग 41136 cusecs असेल.
त्यानंतर पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी जास्त होईल , त्या बाबत आगाऊ सूचना देण्यात येतील
कुमार पाटील
कार्यकारी अभियंता
कोयना धरण व्यवस्थापन