पाटण:- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले दहा दिवस सलग होत असलेल्या मुसळधार पाऊसाने कोयना धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली असून रविवारी सकाळी साडेसहा वाजता धरणातील पाणी साठा ९४ टि.एम.सी. झाला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद ९४ हजार क्युसेस इतकी वाढली होती. सद्या धरणात येणारी आवक १ लाख १ हजार क्युसेस आहे. कोयना नदी पुर परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रविवारी सकाळी ९ वाजता कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे तीन फुटावरुन साडेसहा फुटावर उचलण्यात आले. तदनंतर पाऊसाचे वाढते प्रमाण पहाता दुपारी १.१५ वा. धरणाचे सहावक्र दरवाजे साडेसहा फुटावरुन आठ फुटावर उचलण्यात आले. तर सायंकाळी ५ वा. धरणाचे सहावक्र दरवाजे आठ फुटावरुन थेट अकरा फुटावर उचलण्यात आले असून त्यामुळे कोयना नदीपात्रात येणारा विसर्ग प्रतिसेकंद ६७,८२३हजार क्युसेस झाला आहे. तर सद्या कोयना धरणातील पाणीसाठा ९६.७५ टि.एम.सी इतका झाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडणारा पाऊस आणि धरणातील सोडलेले पाणी यामुळे कोयना नदीपात्रातील पाण्यात देखील झपाट्याने वाढ होऊन पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना नदीवरील नेरळे, मुळगाव हे पुल पाण्याखाली गेले आहेत. तर नदी काठावरील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर अतिदक्षतेसाठी एक्स्ट्रा पोलिस फोर्स मागविण्यात आला आहे. अशा परस्थितीत कोणीही नदीपात्रात उतरु नये. तर कोयना-क्रुष्णा नदी काठावरील गावांनी सतर्क राहवे. असे आहवान प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी कुमार पाटील यांनी केले आहे.
अतिरिक्त पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने कोयना नदीला पुरपरस्थिती निर्माण झाली असून हेळवाक पासून नदीकाठावरील सर्व गावांनी सतर्क राहवे. या पुर परस्थितीत पाटण – मोरगिरी विभाग जोडणारा पुल सायंकाळी ८ वा. पाण्याखाली गेला तर मुळगाव पुल रविवारी सकाळी १० वा. सुमारास पाण्याखाली गेला. आहे. कोयना नदीला आलेल्या या पुरामुळे हेळवाक, शिरळ, संगमनगर धक्का, पाटण, नेरळे, त्रिपुडी, सांगवड, जमदाडवाडी, मंद्रुळ हवेली, निसरे, नावडी, विहे जुने गावठाण येथील अनेक घरांना व कुटुंबांना या पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर पाटण येथील मुळगाव रस्ता, कळकेचाळ, नवीन एस.टी. स्टैंड परिसराला या पुराचा धोका निर्माण झाला असून येथील अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहेत. पाऊसाचे प्रमाण वाढते राहिल्यास कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. तरी नागरीकांनी सतर्क राहवे असे अहवान करण्यात आले आहे.
रविवारी सांयकाळी ५ वा. कोयना धरणातील पाणी पातळी २१५६ . ११ फुट, ६५७ . ४२८ मीटर, तर पाणीसाठा – ९६ . ७५ टि.एम.सी. झाला आहे.
सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा. पर्यंत या नऊ तासात कोयना- ११२ मि.मी. (एकुण – ३९६५ मि.मी.) नवजा – १७७ मि.मी. (एकुण – ४५६०मि.मी.) महाबळेश्वर – १०८ मि.मी. (एकुण – ४१०५) पाऊसाची नोंद झाली आहे. सद्या कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे ११ फुटावर असून ६५७२३ हजार क्युसेस अधिक पायथा विजग्रहातुन २१०० हजार क्युसेस असा एकुण ६७९२३ हजार क्युसेस पाणी प्रतिसेकंद नदीपात्रात पडत आहे.