फलटण – महसूल विभागाची खरी ताकद ही कर्मचारी आणि अधिकारी आहेत. फलटण तालुक्यात महसूल विभागाच्या सर्व विभागाच्यावतीने चांगले काम केले जात आहे. वर्षभर काम करणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक असते यामुळे वर्षभर काम करण्यासाठी प्रेरणा मिळते असे उप विभागीय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.
फलटण येथील सजाई गार्डन येथे दि 2 रोजी महसूल दिना निमित्ताने महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार हनुमंत पाटील,पोलिस निरीक्षक प्रताप पोमन, सहायक निबंधक सुनील धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संतोष जाधव म्हणाले, त्यांनी आपली कर्तव्य पार पाडत असताना एक नेतृत्व म्हणून काम करावे. या फलटण महसूल विभागातून वर्षभरात अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने कामे केली गेलेली आहेत. यावेळी तहसीलदार हनुमंत म्हणाले, वर्षभरात दैनंदिन कामानिमित्ताने अनेक वेळा कुटूंबाला वेळ देता येत नाही. फलटण तालुक्यातील महसूल विभागात सर्व कर्मचारी उत्कृष्ट काम करत आहेत त्यामुळे नागरीकांना सेवा विनाविलंब मिळत आहेत असे पाटील यांनी सांगितले आहे. स्वागत नायब तहसिलदार अनिल ठोंबरे यांनी केले. आभार लक्ष्मीण अहिवळे यांनी मानले.
यावेळी उत्कृष्ठ कामगिरी करणार्या अधिकारी, कर्मचार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमानंतर सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रांत संतोष जाधव, तहसीलदार हणमंत पाटील,नायब तहसीलदार आ. टी.पाटील, अनिल ठोंबरे,अतिरिक्त गट विकास अधिकारी किशोर माने मा.ना.तहसीलदार नंदकुमार भोईटे,सहायक निबंधक सुनील धायगुडे, स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुका अध्यक्ष सिराजभाई शेख, मंडलाधिकारी व्ही.बी.जोशी,एम.ए. देवकाते, जे.बी.कोंडके, टी. बी.भांगे,डी. व्ही.गायकवाड, पी.एन. जाधव,एस. बी.रुपणवर यांच्यासह सर्व मंडलाधिकारी, तलाठी,कोतवाल,पोलीस पाटील, यांच्यासह सर्व पत्रकार नागरिक व अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
जमिनीच्या वादातून भावबंदकी मधील वाद मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने त्यांच्या मध्ये सुसंवाद होऊन वाद होऊ नयेत यासाठी कांबळेश्वर येथील फेसबुकवर असलेल्या चांडाळ चौकडी या ग्रुप ने अतिशय चांगले प्रभोदनपर कार्यक्रम सादर केला या मुळे एक चांगला लोकांनी प्रतिसाद मिळाला
वीर धरणातून पाणी सोडल्याने नीरा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली
RELATED ARTICLES