
प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासोबत मुस्लिम बांधव

च्या आख्खी घरे पाण्याखाली.
पाटण:- (शंकर मोहिते) – कोयनेसह पाटण तालुक्यात सलग १३ व्या दिवशी पाऊसाचा हाहाकार चालूच राहिला असून २४ तासात १०.१ टि.एम.सी. पाण्याची विक्रमी आवक कोयना धरणात झाली आहे. हि सर्वात रेकॉर्ड ब्रेक आवक झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोयना धरणाच्या इतिहासात २४ तासात ६ टि.एम.सी. अशी नोंद होती. केवळ तीन दिवसात ३ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या दरम्यान कोयना धरणात ४०.५ टि.एम.सी. अशी विक्रमी आवक पाण्याची झाली आहे. केवळ २ टि.एम.सी. पाणी साठवण क्षमता धरणाची शिल्लक राहिली असून सद्या धरणात १०३ टि.एम.सी. पाणी साठा झाला आहे. तर शनिवार ते बुधवार या पाच दिवसात कोयना धरणातून २६ टि.एम.सी. पाण्याचा विसर्ग नदीपात्रात झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसाने माजवलेल्या हाहाकाराने पाटण तालुक्यातील पूरपरिस्थिती आजच्या पाचव्या दिवशी कायम राहिली आहे. या पूरपरस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थाच्या बरोबर नागरिक देखील सरसावले आहेत. तर पूरपरिस्थिती कमी येण्यासाठी परमेश्वराकडे धावा अनेकांनी केला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले तेरा दिवस सलग होत असलेल्या मुसळधार पाऊसाने कोयनेसह पाटण तालुक्यात पाऊसाने हाहाकारा माजवला असून पाऊस कमी येण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंगळवार, बुधवार दिवसभर पाऊसाने थैमान घातले आहे.या पाऊसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. पाटण शहरासह हेळवाक, शिरळ, संगमनगर धक्का, पाटण, नेरळे, त्रिपुडी, सांगवड, जमदाडवाडी, मंद्रुळ हवेली, निसरे, नावडी, विहे जुनेगावठाण या गावांती पूर परस्थितीत जैसे थेच आहे. कराड – चिपळूण मार्गावरील वाहतूक देखील आजच्या पाचव्या दिवशी ठप्पच आहे. आणखी पुढील तीन दिवस पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा आदांज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे नागरीकांच्यात भितीचे वातावरण आहे. नागरीकांनी भयभीत न होता सुरक्षित स्थळी राहवे असे आहावान प्रशासनाने केले आहे.
मंगळवारी रात्रभर पाऊसाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र बुधवारी सकाळपासून दिवसभर पाऊसाने पून्हा हाहाकारा माजवला आहे. कोयना धरणातील पाणी साठा बुधवारी सायंकाळी ५ वा. १०३ टि.एम.सी. झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद १ लाख २८ हजार ३१८ इतकी प्रचंड झाली असुन धरणाचे सहावक्र दरवाजे मंगळवारी रात्री दोन फूटाने कमी करण्यात आले होते मात्र ते पुन्हा बुधवारी सायंकाळी ४ वा. चौदा फुटावरुन सोळा फुटावर केले आहे. यामुळे कोयना नदीत येणारा पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १ लाख १० हजार २८३ ऐवढा झाला आहे. कोयना धरणाच्या इतिहासात प्रथमच या वर्षी १ लाख २८ हजार पर्यंत ऐवढा विसर्ग नदीपात्रात गेला आहे. तर कोयना नदीला मिळणाऱ्या उपनद्यांची देखील धोक्याची पातळी जैसे थे असुन काजळी, काफना, केरा, मोरणा या नद्या महापूराने दुतड्या भरून वाहत आहेत. यामुळे कोयना नदीच्या पातळीत दुप्पटीने वाढ होत आहे. यामुळे कोयना नदीचा पूर काही ओसरण्याची चिन्हे नाहीत.
कोयना नदीवरील नेरळे, मुळगाव हे पुल चौथ्या दिवशी पाण्याखालीच असून कोयना मार्केट येथील पुल, नवीन संगमनगर धक्कापुल, निसरे पुलावरून पाणी जात आहे. नदी काठावरील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर कराड – चिपळूण मार्गावर अनेक ठिकाणी पाणी आले असून वाहतूक ठप्प झाली आहे. अतिदक्षतेसाठी एक्स्ट्रा पोलिस फोर्स मागविण्यात आला आहे. तर एन.डी.एफ. टिम नागरीकांच्या मदतीला पाचारण करण्यात आली आहे. अशा परस्थितीत कोणीही नदीपात्रात उतरु नये. तर कोयना-क्रुष्णा नदी काठावरील गावांनी सतर्क राहवे. असे आहवान प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी कुमार पाटील यांनी केले आहे.
चौकट-
पूरग्रस्तांना मुस्लिम बांधवांनी केले अन्नदान.
पूरग्रस्तांच्या बरोबर प्रांताधिकारी बसले जेवायला.
पाटण येथे कोयना नदीला आलेल्या महापूरामुळे सरासरी ३५० ते ४०० पुरग्रस्तांना येथील कै.ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले आहे. या पूरग्रस्तांना स्थानिक सामाजिक संस्थेकडून दररोज अन्नदान सेवा सुरू आहे. बुधवारी सकाळी पाटण (रामापूर) येथील मुस्लिम बांधवांनी या पुरग्रस्तांना अन्नदान केले. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व त्यांची टिम या ठिकाणी पुरग्रस्तांची व्यवस्था पाहण्यास आले होते. मुस्लिम बांधवांनी केलेल्या अन्नदाना बध्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पुरग्रस्तांच्या पंकतीला खुद्द प्रांताधिकारी व त्यांची टिम जेवायला बसल्याने पुरग्रस्तांना प्रांताधिकारी आपल्याच कुटुंबातील एक भाग वाटू लागले.
फोटो – १) पाटण येथील मुख्य झेंडा चौक ते एस.टी.स्टैंड परिसर व मुळगाव रस्त्यावर आलेले कोयनेचे पाणी.
२) पाटण मधील काही आख्खी
च्या आख्खी घरे पाण्याखाली.
३) पुरग्रस्तांना मुस्लिम बांधवांनी केलेल्या अन्नदान वेळी
प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासोबत मुस्लिम बांधव