सातारा : कास पुष्प पठाराकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने कास पठारावर उमलणारी फुले पाहणे अवघड झाले आहे. गेली अनेक दिवस कास परिसरात संततधार कोसळणार्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच सातार्याहून कास पठारकडे जाताना पारंबे फाटा, एकीव फाटा तिथून पुढे कास पठारकडे जाताना हेरिटेजवाडी हॉटेलशेजारी आटाळी गावाच्या डाव्या बाजूला संपूर्ण सपाट असणारा रस्ता मध्यातून खचला आहे.
नेहमीप्रमाणे सुरक्षेसाठी असणारे कास कार्यकारी समितीचे कर्मचारी यांच्या निदर्शनास हा रस्ता येताच त्यांनी समिती अध्यक्ष सोमनाथ जाधव यांना या प्रकाराची माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचार्यांच्या मदतीने रस्ताच्या दोन्ही बाजूला झाडी टाकून काही काळ कर्मचार्यांना त्या ठिकाणी देखरेखीखाली ठेवले. सकाळी कास तलावापर्यंत जाणार्या एस टी बस देखील अलीकडे थांबवण्यात आल्या. कास कार्यकारी समितीच्या कर्मचार्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. पारंबे फाटा ते कास पठार हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे सपाट असल्याने व कोणत्याही प्रकारचा तीव्र उतार नसल्याने या सपाट जागी रस्ता खचलाच कसा? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर बांधकाम विभागाने पाहणी केल्यावर रस्ता नक्की कशामुळे खचला हे लक्षात येणार आहे.सातारा : कास पुष्प पठाराकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने खचल्याने कास पठारावर उमलणारी फुले पाहणे अवघड झाले आहे. गेली अनेक दिवस कास परिसरात संततधार कोसळणार्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच सातार्याहून कास पठारकडे जाताना पारंबे फाटा, एकीव फाटा तिथून पुढे कास पठारकडे जाताना हेरिटेजवाडी हॉटेलशेजारी आटाळी गावाच्या डाव्या बाजूला संपूर्ण सपाट असणारा रस्ता मध्यातून खचला आहे.
नेहमीप्रमाणे सुरक्षेसाठी असणारे कास कार्यकारी समितीचे कर्मचारी यांच्या निदर्शनास हा रस्ता येताच त्यांनी समिती अध्यक्ष सोमनाथ जाधव यांना या प्रकाराची माहिती दिली. जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचार्यांच्या मदतीने रस्ताच्या दोन्ही बाजूला झाडी टाकून काही काळ कर्मचार्यांना त्या ठिकाणी देखरेखीखाली ठेवले. सकाळी कास तलावापर्यंत जाणार्या एस टी बस देखील अलीकडे थांबवण्यात आल्या. कास कार्यकारी समितीच्या कर्मचार्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. पारंबे फाटा ते कास पठार हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे सपाट असल्याने व कोणत्याही प्रकारचा तीव्र उतार नसल्याने या सपाट जागी रस्ता खचलाच कसा? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर बांधकाम विभागाने पाहणी केल्यावर रस्ता नक्की कशामुळे खचला हे लक्षात येणार आहे.
कास पुष्प पठाराकडे जाणारा रस्ता मध्यातून खचला
RELATED ARTICLES