पाटण- कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यातील पाऊस मंदावला असून बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर अधुनमधून पाऊसाच्या हालक्या सरी येत राहिल्या तर या परिसरातील पाऊस बऱ्यापैकी मंदावला आसल्याने कोयना धरणातून होणऱ्या पाण्याचा विसर्ग गुरवारी तब्बल आठ फुटांनी कमी करण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीला निर्माण झालेली पुरपरस्थिती काही अंशी ओसरली असुन अनेक ठिकाणी पाण्याखाली गेलेला कराड – चिपळूण मार्ग मोकळा झाला आहे. तर पाटण नवीन एस.टी.स्टैंड परिसर, नगरपंचायत परिसरातील पुराचे पाणी ओसरले आहे. कोयना नदीवरील कोयना येथील जुना मार्केट पुल, संगमनगर धक्का येथील नवीन पुल, नेरळे पुल, निसरे पुल, तांबवे पुल खुले झाले आहेत. मात्र मुळगाव पुल अद्याप पाण्याखालीच आहे. या पुरपरस्थिती मुळे कोयना नदी काठावरील रहिवासी नागरिक, व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांच्या बरोबर शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे.
गेले १२ दिवस कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात पाऊसाने हाहाकार माजवला होता. या पाऊसाने कोयना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत होती. धरण १० टि.एम.सी. भरण्यास अपुरे असतानाच पाऊसाचे वाढते प्रमाण बघून पाणी साठा झपाट्याने ८५ टि.एम.सी. वर आल्यानंतर दि. ३ औगस्ट शनिवारी कोयना धरणाच्या वरील सहा वक्रदरवाज्यातुन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. व दरवाजे दोन फूटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. मात्र बिघडलेला पाऊस कोसळत आसताना धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत होती. धरणाचे पाणी नियंत्रित राहण्यासाठी रविवारी दि. ४ रोजी एका दिवसात वक्रदरवाजे २ – ४ -६ – ११ फूटावर तर सोमवारी दि. ५ रोजी १४.६ – १६ फूटावर असे टप्याटप्याने उचलण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १ लाख ३० हजार पर्यंत गेला. आणि कोयना काठ महापुराने भेदरला.
ही पुरपरस्थिती बुधवारी रात्री पर्यंत राहिली. बुधवारी मध्यरात्री नंतर पाऊसाचे प्रमाण कमी आल्याने धरणाचे वक्र दरवाजे गुरवारी पहाटे १६ फूटावरुन १३ फूटावर गुरवारी सकाळी दहाच्या सुमारास व १३ वरुन ८ फूटावर घेण्यात आले. यामुळे पाटण तालुक्यात निर्माण झालेली पुरपरस्थिती बऱ्याच अंशी ओसरली तर नागरीकांची पुरपरस्थितीतुन सुटका झाली. या पुराने कोयना कठावरील हेळवाक, शिरळ, मारूल, येराड, पाटण, त्रिपुडी, सांगवड, मंद्रुळ हवेली, नावडी, जमदाडवाडी या गावांत पाणी सिरले. यामुळे येथील रहिवासी नागरिक, व्यापारी, व्यावसायिक त्याच बरोबर कोयना काठावरील शेतीचे आतोनाथ नुकसान झाले. गेले पाच दिवस हि पुरपरस्थिती हाताळण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन, नगरपंचायत कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत होते. स्थानिक सामाजिक संस्था, नागरिक यांनी देखील या पुरपरस्थितीत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले. पत्रकारांनी देखील या पुरपरस्थितीत पुरग्रस्त, प्रशासन यांना वेळोवेळी सहकार्य करून मदत केली.
गुरवारी सायंकाळी ६ वा. कोयना धरणात पाण्याची येणारी आवक प्रतिसेकंद – ८१ हजार १३० क्युसेस आहे. तर नदीपात्रात विसर्ग प्रतिसेकंद – ६९ हजार ०७५ क्युसेस आहे. धरणातील पाणीसाठा – १०३ टि.एम.सी. तर पाणीपातळी – २१६१ . ९ फूट आणि ६५८ . ९०१ मीटर इतकी आहे.