म्हसवड : म्हसवड येथील मेरी माता हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांची जमा झालेली शैक्षणिक फी सुमारे 3 लाख 24 हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने ऑफिसचे कुलुप तोडून चोरून नेली असून या बाबतची फिर्याद सदर स्कूलचे मॅनेजर फादर एमेल अब्राहिम यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
या बाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की म्हसवड येथे मेरी माता हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज आहे. 9 रोजी दुपारी हायस्कूल मध्ये पालक मिटींग आयोजित करण्यात आली होती. या वेळी मिटींग झाल्या नंतर पालकांनी मुलांची जुन ते सप्टेंबर पर्यंतची स्कूल फी व बस फी जमा केली होती. तर 8रोजी 65हजार रूपये फी जमा झाली होती. व पालक मिटींग ला उशीर झाल्या कारणाने जमा झालेली रोख रक्कम 2लाख 59हजार शाळेच्या ऑफिस कॅश काउंटर मध्ये ठेवण्यात आली होती. कॅश जमा करणेकरिता शाळेतील सौ.शारदा दिलिप शिंगाडे व अकाऊटंट शिंटो एलदोस यांची यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु सौ.शिंगाडे व शिंटो या दोघीही आजारी असतानाही शाळेत आल्या होत्या परंतू जमा असलेली रक्कम वेळ झाला असल्याने बॅकेत भरता आली नाही. या नंतर फिर्यादी फादर एमेल अब्राहिम हे शाळेतील आश्रमात रात्री 11:30 वाजणेच्या सुमारास झोपी झोपले होते.
सकाळी 10रोजी शाळेची प्रार्थना संपले फादर ऑफिस कडे चालले होते या वेळी त्यांचे सोबत राजूसर होते, राजूसर यांनी ऑफिसचे कुलुप खाली पडले असल्याचे सांगितले.जवळ जाऊन पाहिलं तर कुलुप तुटलेय आता ऑफिस मध्ये कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली दिसली तर ऑफिस मधील कॅश ड्रॉवर पाहिले असता ते उघडेच होते.दरम्यान शाळेचा स्टाफ आला, त्यांचे समक्ष पुन्हा कॅश ड्रॉवर पाहिले असता त्या मधील शाळेतील मुलांची जमा असलेली फी एकूण रक्कम रूपये 3 लाख 24 हजार अज्ञाताने शाळेच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या भिंतीवरून प्रवेश करून ऑफिसलला लावलेले कुलुप तोडून ड्रॉवर मधील रक्कम चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. अशी फिर्याद मेरी माता हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज फादर एमेल अब्राहिम यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.
मेरी माता हायस्कूलचे ऑफिसचे कुलुप तोडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीवर 3 लाखाच्या चोरट्याने मारला डल्ला
RELATED ARTICLES