फलटण: धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे व अनुसूचित जमाती च्या सवलतीची तात्काळ अंमलबजावणी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात मंगळवार 13 ऑगस्ट 2019 रोजी पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी फलटण तहसील कचेरी येथे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समस्त सकल धनगर समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील धनगर समाजाचे नेतेमंडळीं, युवक, युवती व समाजबांधव मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाचे आयोजन समस्त सकल धनगर समाज फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनास जि.सदस्य भावनाताई सोनवलकर, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेवक कुमार शिंदे, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ वैशाली चोरमले, सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत, यशवंत खलाटे, नगरसेवक किशोर ना निंबाळकर, जयकुमार शिंदे, रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहूल निंबाळकर, भाऊसाहेब कापसे, महाबळेश्वरचे ,ओ.बी.सी. एन.टी पार्टिचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, सोनार समाजाच्या वतीने नगरसेवक अजय माळवे, नगरसेवक पांडुरंग गुजवटे, रामोशी समाज संघटनेच्या वतीने अनिल शिरतोडे, फलटण शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मिलिंद नेवसे, सुधीर अहिवळे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.नरसिंह निकम, प्रयाग सामाजिक संस्थेच्या सौ.भोजने मॅडम, रासप च्या कल्पना गिड्डे , मोनाली शिंत्रे, मुस्लिम समाजाच्या वतीने माजी संचालक सिराज भाई शेख,इ.सह धनगर समाजातील अनेक मान्यंवर नेते मंडळीं युवक व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
धनगर समाज बांधवांचे ठिय्या आंदोलन
RELATED ARTICLES