Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीफलटणमधील अपंग मुलांकडूनही पूरग्रस्तांना मदत

फलटणमधील अपंग मुलांकडूनही पूरग्रस्तांना मदत

फलटण: सातारा, सांगली ,कोल्हापूर जिल्ह्यात भयानक महापूराची परिस्थिती उद्भवल्याने राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. अशातच महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील अपंग मुलांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी सर्व प्रकारचे संसार उपयोगी साहित्य जमा करून यामध्ये विशेष करून साखर, मैदा, गरा, तांदूळ, बिस्कीटचे बॉक्स बिसलरी पाण्याचे बॉक्स तसेच दैनंदिन वापरातील अन्य वस्तूही मूकबधिर मुलांनी फलटण शहरांमध्ये फेरी काढून जमा केल्या आहेत.
फाटलेले आभाळ आणि वरुणराजाने वटारले डोळे नद्यांनी दाखवलेले अक्राळ विक्राळ रूप कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील तसेच सातारा जिल्ह्यातील अनेकांच्या संसार वरती पाणी फिरवणारे ठरले आहे. पाहता-पाहता होत्याचे नव्हते झालेल्या अनेकांना आता समजातुन मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे.
माणूसकीची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणे अत्यावश्यक असल्याची जाणीव ठेवून मूकबधिर विद्यालयातील अपंग मुकबधीर मुले आणि मुलींनी समाजोपयोगी उपक्रमांत नेहमीच हिरारीने सहभाग नोंदविला आहे.
या मूकबधिर मुलांच्या आव्हानाला फलटण शहरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशीही मूकबधिर मुले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिरताना दिसत होते व जे जे शक्य आहे ते साहित्य जमा करून संस्थेचे कार्यकारीअध्यक्ष कृष्णाथ उर्फ़ दादासाहेब चोरमले, संस्थेच्या सचिव वैशाली चोरमले, मुकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिप्ती देसाई, फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद नेवसे , नगरसेवक अजय माळवे, पत्रकार किरण बोळे, विशाल शहा, सुधीर अहिवळे यांच्या हस्ते फलटणचे नायब तहसीलदार आर .सी. पाटील यांच्याकडे जमा केल व तसेच रोख रक्कम 5001 रु.मुख्यमंत्री निधीस मदत दिली.यावेळी मुकबधीर विद्यालयाच्या शिक्षक वैशाली शिंदे, उदय निकम, निर्मला चोरमले, रेवती काकडे, हेमा गोडसे, नितेश शिंदें, चैतन्य खरात, सौ.शशीकला विटकर तसेच पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular