Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedचोरट्यानी घरातील कपाट फोडून दोन लाख रूपयांचा मुद्देमाल केला लंपास

चोरट्यानी घरातील कपाट फोडून दोन लाख रूपयांचा मुद्देमाल केला लंपास

म्हसवड : गंगोती, ता. माण येथील दाजी निराप्पा हुबाले यांच्या घरातून शनिवार 17 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी घरातील कपाट फोडून पाच तोळे व 30 हजार रूपयांची रोकड असा सुमारे दोन लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अशी गंगोती ता माण येथील शेतकरी दाजी निराप्पा हुबाले हे म्हसवड येथील चारा छावणीवर तीन जनावरं असल्याने छावणीवरच मुक्कामाला होते. त्यांचे गंगोती येथील हुबाले वस्तीवर दोन खोल्याचे घर असून घराला पुढे सोफा असून भिंतीचे कंपाऊड आहे.
शनिवार 17रोजी रात्री दाजी हुबाले हे म्हसवड येथील चारा छावणीवर मुक्कामी होते. तर पत्नी सुगंदा हुबाले व मुंबई वरून आलेला मुलगा नितिन हुबाले हा बाहेर सोफ्यात झोपले होते. रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यानी घरात शिरून घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने चैन, अंगठी,दोन बदाम,कानातील कर्ण फुले, झुबे असे मिळून पाच तोळे सोन्याचे दागिने व रोकड 30हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत दाजी हुबाले यांनी म्हसवड ठाण्यात धाव घेतली असता चोरीचा तक्रार केली असून म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नविन कारभारी गणेश वाघमोडे हे आज 18रोजी हजर होत असून पदभार स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असल्याने गुन्हा नोंद झाला नसल्यामुळे नविन कारभारी गणेश वाघमोडे यांचे समोर पहिल्याच दिवशी चोरीच्या गुन्ह्याने स्वागत झाल्याने त्यांच्या समोर चोरीचा तपास करण्याचे आवाहन उभे राहिले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular