Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची मदत

फलटण येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची मदत

फलटण: कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत गुणवरे येथील ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांची मदत व 1 हजार वह्या संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे व सचिव साधनाताई गावडे यांनी तहसीलदार हणमंत पाटील यांच्या कडे सुपूर्द केला यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व पुणे इन्स्पेक्टर संभाजी गावडे व राजदीप गावडे हे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील अनेक गावात आलेल्या पुराच्या पाण्याने गावेच्या गावे उद्धवस्त झाली तर अनेकांचे संसार या पाण्यात वाहून गेले या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सरकार व सेवाभावी संस्था मदत करीत आहेत.
यामुळे या भागातील लोकांचे पुनर्वसन व त्यांचे संसार पुन्हा उभे राहावेत या साठी गुणवरे येथील इश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी सांगली जिल्ह्यातील मुलांना 1 हजार वह्या देण्यात आल्या या वेळी सामाजिक कार्यकरत्या नितु चव्हाण, स्वप्नील शिंदे, शेखर गायकवाड व शेखर गावडे हे उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular