केळघर : सांगली जिल्ह्यतील पलूस तालुक्यातील नागठाणे गावाला नुकतीच जावली तालुक्यातील केडंबे, तळोशी गावातील ग्रामस्थांकडून तांदूळ, गहू तसेच कपडे वाटप करण्यात आले.
दोन्ही गावातील ग्रामस्थांकडून टेंपो भरून नागठाणे येथील दलित वस्ती व मातंग वस्ती येथील नागरिकांना हे साहित्य देण्यात आले.
यावेळी केडंबे सरपंच प्रकाश ओंबळे, श्रमिक जनता विकास सस्थेचे अध्यक्ष आदिनाथ ओंबळे, किरण ओंबळे, शिवाजी ओबळे, अरुण सुतार, सर्जेराव लोहार, गोरख ओबंळे, प्रकाश ओंबळे, सुशांत शेलार इत्यादी युवक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.
नागठाणे (पलूस) येथील दलित वस्ती, मातंग वस्तीमध्ये यावेळी तादूळ, गहू व साडया कपडे असे एकूण 200 किटचे वाटप करण्यात आले. शहाजी कांबळे स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांना हे साहित्य प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.
केडंबे ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना साहित्य वाटप
RELATED ARTICLES