Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमहिलांनी मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करावेत: अश्विनी महांगडे

महिलांनी मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करावेत: अश्विनी महांगडे

वाई : मुलींना आणि महिलांना मासिक पाळी येणे ही नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. या कालावधीत मुलींना आराम मिळावा म्हणून बाहेर बसविणे ही श्रद्धा असली तरी त्यांना स्पर्श केल्यावर विटाळ होतो ही अंधश्रद्धा समाजात मोठ्या प्रमाणावर रुजली आहे. याविषयीचे गैरसमज दूर केले पाहिजेत असे, प्रतिपादन प्रख्यात सिनेअभिनेत्री, झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेत शिवकन्या राणूआक्का फेम, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा- आश्विनी महांगडे यांनी नरसिंह हायस्कूल धोम मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
अश्विनी महांगडे या नरसिंह हायस्कूल धोम मध्ये आरोग्याविषयीचे महिलांमधील गैरसमज या विषयावर त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी मुख्याद्यापक नलिनी मांढरे, प्रा.सुनील फरांदे, शिवाजी सुरवसे, वैभव देसाई, दत्तात्रय देसाई, प्रियांका दळवी, नाना चिचकर, उत्तम झांजुर्णे, सेवक दत्तात्रय महांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना आश्विनी महांगडे पुढे म्हणाल्या, जीवनात चांगला गुरू मिळाला की अशक्य गोष्टीही साध्य करतायेतात. त्यामुळेच मी अभिनयक्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आहेत. याविषयी मुलींमध्ये आणि महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहोत.
तरुण वयातील मुलींनी मासिक पाळीचे शास्त्र समजून घेऊन त्याबाबतच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पालकांशी मनमोकळेपणे बोलले पाहिजे असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविकसौ, नलिनी मांढरे यांनी केले.
सूत्रसंचालन कृष्णा कांबळे, यांनी तर आभार प्रा. संतोष पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमास धोम हायस्कूल मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवकन्या राणूआक्काच्या भूमिकेत गाजत असलेल्या आश्विनी महांगडे यांच्याशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राणूआक्काच्या संवादाला विद्यार्थिनींनी मोठी दाद दिली. मासिक पाळी याविषयावर सुरवातीला फारशा न बोलणार्याल विद्यार्थीनींनी नंतर धीटपणे याबाबत मनमोकळेपणाने आपल्या शंका विचारल्या.
निलिनी मांढरे ( मुख्याद्यापिका नरसिंह हायस्कूल धोम)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular