Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीथोर स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब वीर जयंती जिल्हा बँकेत संपन्न

थोर स्वातंत्र्य सेनानी आबासाहेब वीर जयंती जिल्हा बँकेत संपन्न

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जडणघडणीत व उत्कर्षात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे थोर देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर यांची 119 वी जयंती शुक्रवार दि.23 रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे संपन्न झाली .
यावेळी बँकेचे अध्यक्ष आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, किसनवीर आबांनी स्वातंत्र्यापूर्वी अंगीकारलेले देश सेवेचे व्रत निस्वार्थीपणे पार पाडणेसाठी लोक प्रतिनिधीत्वाची पदे जबाबदारीने व यशस्वीरीत्या भूषवली.
या कारकिर्दीत धोम धरण व सर्वदूर दुष्काळी भागात घेऊन जाणारे धोम कालवे, किसनवीर महाविद्यालय, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि शेतकर्‍यांना समृद्धीकडे नेण्यास सज्ज असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध संस्था सुरु करणेमागे आबांचा मोठा वाटा आहे.
याप्रसंगी बँकेचे संचालक विक्रमसिंह पाटणकर, प्रकाश बडेकर, वसंतराव मानकुमरे, प्रदीप विधाते, संचालिका सुरेखा पाटील, कांचन साळुंखे यांनी आबासाहेब वीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र आदरांजली वाहिली.
यावेळी उपस्थित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे व आर.एम.भिलारे, व्यवस्थापक प्रदीप शिंदे, सुजित शेख, एस.वाय.गायकवाड, विनायक कदम, नाना लंगुटे, सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधिक्षक, सेवक यांनीही प्रतिमेस फुले वाहून आदरांजली वाहिली .
याचबरोबर बँकेच्या पोवई नाका, सातारा येथील यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र इमारतीचे प्रांगणातील आबासाहेब वीर यांचे पुतळयास हार घालून व फुले वाहून आदरांजली वाहिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular