Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीज्ञानदीप संस्थेच्यावतीने स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव

ज्ञानदीप संस्थेच्यावतीने स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव

कराड: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमातर्गंत क्रांतीसिंह नाना पाटील जयंतीदिवशी येथील कराड तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करण्यात आला.
येथील हुतात्मा स्मारकात ओंड येथील ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने आयोजित स्वातंत्र्य सैनिकांच्या गौरव समारंभात कराड तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळकृष्ण कोळेकर, स्वातंत्र्य सैनिक आनंदा जाधव, स्वातंत्र्य सैनिक भानुदास पाटील, स्वातंत्र्य सैनिक हिंदुराव जाधव यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कराडचे पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, ज्ञानदीपचे अध्यक्ष आनंदा थोरात, क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समितीचे संपतराव जाधव, सातारा प्रतिसरकार व आझाद हिंद सेना अमृत महोत्सव समन्वयक अजित जाधव, अमोल कांबळे, नेताजी थोरात, सुजीत माने, संभाजी जमाले, मोहन कुंभार, मधुराणी थोरात यांची उपस्थिती होती.
नवनाथ ढवळे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती देवून मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाने स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श डोळयासमोर ठेवून देशासाठी योगदान देण्याची गरज व्यक्त केली. अर्चना पाटील यांनी सुत्रसंचालन केले. सुवर्णा सुर्वे, सुप्रिया लटके व तेजस्वी ढापरे यांनी स्वागत केले. मृणाल गरुड यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular