वाई : वाई शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दहीहान्डीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला परंतु सांस्कृतिक परंपरा जपणार्या वाई शहरात गंगापुरी मंडळाने व ढोर गल्ली रविवार पेठेने पाण्यातील दहीहंडी बांधून सर्व वाईकरांचे लक्ष वेधून घेत एक वेगळी परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला, त्याला वाईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
दरम्यान शनिवारी झालेल्या दहीहंडी व गोपाळकाला कार्यक्रमात गांगापुरीतील (नावेचीवाडी) येथील अजित शिंदे व त्यांच्या मंडळाने गांगापुरीच्या घाटावर पाण्यात दहीहंडी बांधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर रविवार पेठेतील ढोर गल्लीत गेल्या अनेक वर्षांपासून किरवे ओढ्यात पाण्यात दहीहंडी बांधून आपली परंपरा कायम ठेवली. वाई शहरातील सर्व मंडळांच्या हंड्या फोडण्याचा मान सिद्धनाथवाडीतील दहीहंडी मंडळाला असून येथील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्याचा कसून सराव हि करीत होते. वाई शहरातील विविध ठिकाणची दहीहंडी फोडून पन्नास हजारांपेक्षा जास्त इनाम सिद्धनाथवाडीतील गोविंदा पथकानेकमविले आहे.
किसनवीर चौकातील मानाची व वाईतील शेवटची दहीहंडी रात्री साडेदहा वाजता फोडण्यात आली. रविवार पेठेतील मंडळे हे काही वर्षांपासून स्वतःच्या परिसरातील दहीहंडी स्वतःच फोडतात ही प्रथा सध्या रूढ होवू पहात आहे. पोलीस प्रशासनाने डॉल्बीवर कारवाई करून बंद करण्यात आली.
दरम्यान वाई शहरात पोलीस उपाधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
वाई शहरात पाण्यातील दहीहंडीने वाईकरांचे घेतले लक्ष वेधून
RELATED ARTICLES