केळघर: दि ग्रेट जावली- महाबळेश्वर प्रतिष्ठाण, ठाणे (महाराष्ट्र राज्य) यांचा पूरग्रस्तांसाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी जमा झालेले साहित्य रासाटी, ता. पाटण, जि. सातारा या गावाला तसेच आजूबाजूच्या परिसरातील पूरग्रस्त बांधवांना देण्यात आले.
यावेळी जावळीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ व प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तसेच वाई महाबळेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश कदम यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. आम्ही जपतो समाजसेवेचा वारसा या उक्तीने प्रेरीत होऊन प्रतिष्ठाणच्या कार्यकारी मंडळाने आपल्या बांधवांसाठी कर्तव्याच्या भावनेतूनच जीवनाश्यक वस्तु, वस्त्र, औषधे, ब्लँकेटस इत्यादी स्वरूपामध्ये आपल्या दात्यांकडून उपलब्ध केले. दात्यांनी केलेल्या योगदानामुळे दोनशे बाधित कुटूंबाना आम्हाला दिलासा देता आला अशी माहिती प्रतिष्ठाण चे सचिव विकास दळवी व कार्याध्यक्ष विनोद शिंगटे यांनी दिली याप्रसंगी प्रतिष्ठाणच्या वतीने सर्व दात्यांचे ऋण या ऋणानिर्देशा बरोबरच आभार व्यक्त केले.
प्रतिष्ठानचे आधारस्तंभ ना.एकनाथजी शिंदे साहेब (सा.बा. मंत्री व पालकमंत्री ठाणे जिल्हा), लालबागचे माजी आमदार दगडू दादा सपकाळ, खासदारडॉ. श्रीकांत शिंदे, जावलीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, प्रतिष्ठाणचे सल्लागार नगरसेवक प्रकाश शिंदे, सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठाण वेळोवेळी महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यांमध्येही सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवित आहे.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरीता प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष व जावली बँकेचे विद्यमान संचालक राजाराम ओंबळे, मनोहर दळवी, कार्याध्यक्ष विनोद शिंगटे, सिताराम धनावडे, विजय सावले, खजिनदार शंकर दळवी, मार्गदर्शक के.के. शेलार, संतोष संकपाळ, संचालक दत्ताभाऊ सपकाळ, यशवंत दळवी, प्रविण सावले, तुकाराम शिंदे, विष्णु माने, संदीप दळवी, मयुर दळवी, श्याम धनावडे, प्रसाद धनावडे, संतोष जो. सपकाळ आदींनी परीश्रम घेतले.
मदत नव्हे तर कर्तव्य
RELATED ARTICLES