फलटण: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत 14 वर्षे वयोगट व 42 किलो वजन गटात फ्रीस्टाइल कुस्ती या खेळ प्रकारांमध्ये जिल्हा परिषद प्राथ. शाळा काळज येथील विद्यार्थिनी सायली नबाजी गाढवे इयत्ता सातवी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
दि.23 ऑगस्ट 2019 रोजी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत मौजे झिरपवाडी तालुका फलटण येथे झालेल्या 14 वर्षे वयोगट व 42 किलो वजन गटात फ्रीस्टाइल कुस्ती या खेळ प्रकारांमध्ये जिल्हा परिषद प्राथ. शाळा काळज येथील विद्यार्थिनी सायली नबाजी गाढवे इयत्ता सातवी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गंबरे तसेच बीट शिक्षण विस्ताराधिकारी अनिल संकपाळ साहेब आणि तरडगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रमिला रणवरे यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळजच्या मुख्याध्यापिका अंजना चिरमे आणि सर्व शिक्षक वृंद यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. तसेच शालेय व्यवस्थापन समिती काळजचे अध्यक्ष शामराव गाढवे आणि उपाध्यक्ष प्रतिमा गाढवे तसेच व्यवस्थापन समितीतील इतर सर्व सदस्यांनीही तिचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेसाठी व वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
याबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सायली गाढवे प्रथम
RELATED ARTICLES