Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीराष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे कोरेगावात जोरदार स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे कोरेगावात जोरदार स्वागत

कोरेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेने बुधवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. छत्रपती संभाजी महाराज फेम खासदार डॉ. अमोल कोल्हे हे यात्रेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांना पाहण्यासाठी कोरेगावात प्रचंड गर्दी झाली होती. पुसेगाव ते कोरेगाव दरम्यान मोठी रॅली काढण्यात आली. कोरेगावात त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार शशिकांत शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता.
शिवस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने सर्वांचेच विशेषत: राजकीय मंडळींचे लक्ष लागून राहिले होते. माण आणि खटावनंतर कोरेगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी यात्रा दाखल झाली. भव्य रॅलीद्वारे यात्रा कोरेगाव शहरात दाखल झाली. कुमठे फाट्यापासून युवकांची गर्दी लक्ष वेधून घेत होती. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार शशिकांत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी थेट सातारा येथे जाहीर सभेसाठी जाणे पसंत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, बाळासाहेब फाळके, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, संजय झंवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, युवकचे निलेश जगदाळे, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कार्याध्यक्ष श्रीमंतदादा झांजुर्णे, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, बाजार समितीचे सभापती प्रतापराव कुमुकले-निकम, तानाजीराव मदने, उपनगराध्यक्षा सौ. संगीता बर्गे, नगरसेवक संजय पिसाळ, जयवंत पवार, किशोर बर्गे, नवनाथ बर्गे, महादेव जाधव, नागेश कांबळे, दीपक फडतरे, गणेश येवले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. डॉ. अमोल कोल्हे यांंची सेल्फी घेण्यासाठी तरुणांमध्ये चढाओढ होती. या यात्रेमुळे सुमारे तासभर सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular