Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकोरेगावातून महायुतीचे उमेदवार महेश शिंदेच : ना. चंद्रकांतदादां पाटील

कोरेगावातून महायुतीचे उमेदवार महेश शिंदेच : ना. चंद्रकांतदादां पाटील

कोरेगाव : देशभरात भाजपाच्या प्रवाहात कार्यकर्ते सामील होत असून महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी भाजपासाठी मनापासून काम केले त्या कार्यकर्त्यांना अग्रक्रमाने संधी देणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदार संघात महेश शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यांनी भाजपासाठी केलेले काम जनता आणि भाजपा यांच्या पसंतीला उतरणारे भरीव काम केले आहे. स्वाभिमानी कार्यकर्ते आज भाजपात आलेत त्यांना मानसन्मान देवू त्यांनी महेश शिंदेच्या पाठीशी भरभक्कम उभे राहून भाजपाचा व महायुतीचा अभेद्य गड म्हणून कोरेगाव मतदारसंघाची ओळख निर्माण करावी असे प्रदेश अध्यक्ष मा.ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. कोरेगाव येथे शिवरत्न मंगल कार्यालयात झालेल्या स्वाभिमानी विचारमंचच्या भाजपा प्रवेश व महेश शिंदे यांना पाठिंबा कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरेगाव विधानसभा मतदार संघात स्वाभिमानी विचार मंचाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विद्यमान आमदारांविरूध्द राष्ट्रवादी अंतर्गत कार्यकर्ते यांनी रान उठविले होते त्याचा अंतिम निर्णय भाजपा प्रवेशात होवून महेश शिंदे हेच महायुतीचे उमेदवार समजून जाहीर काम करण्याचा निर्णय झाला. हजारो लोकांच्या जाहीर उपस्थितीत शेकडो प्रमुख कार्यकर्ते आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपात सामील झाले.
एकमुखी महेश शिंदे हेच आमचे उमेदवार असून महेश शिंदे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची शपथच आज चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत स्वाभिमानी विचारमंचच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
कोरेगावं खराव सातारा विधानसभेचे उमेदवार मा.महेश शिंदेच असणार ,भाजपला जागा मिळाली तर आणि नाही मिळाली तर युतीतून पण काही झाले तरी उमेदवार मा.महेश शिंदेच असणार आणि आमदार सुद्धा महेश शिंदेच होणार आदरणीय प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केले
स्वाभिमानी विचार मंचाचा पक्ष प्रवेश, सुनीलजी खत्री, विठ्ठलजी कदम, नाना भिलारे, नारायणराव फाळके, पोपटराव जगदाळे ,राजेंद्र घाडगे ,उदयसिंह बर्गे, अ‍ॅड.दीपक शिंदे,अ‍ॅड सतीश कदम, वसंतराव जाधव,अभिजित फाळके, दिलीप राव कदम, अशोक येवले, राजेंद्र देशमुख, मनोज गाढवे, विजयराव घोरपडे, शहाजीराव साळुंखे, मधुकर भोसले, नितीन काटकर, सुधीर जगदाळे, राजेंद्र साळुंखे नारायण सकुंडे, नंदकुमार सकुंडे, तानाजीराव नलगे, दीपक सणस, अशोक सणस, विजय कुमार पोरे, आनंद राव शिंदे, उत्तम सकुंडे, शिवराम संकपाळ, जनार्धन जगदाळे, आनंदराव माने, पोपट मदने, गणेश काटे, बाळासाहेब आवटे, तसेच स्वाभिमानी विचारमंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा युवा अध्यक्ष नितीन भोसले व त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. या कार्यक्रमा प्रसंगी ना. शेखर चरेगावकर, मदन भोसले, विक्रम पावस्कर, महेश शिंदे, संतोष जाधव, निलेश नलवडे, राहुल बर्गे, रमेश उबाळे, निलेश यादव, श्रीकांत बर्गे व स्वाभिमानी विचारमंच कार्यकर्ते व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular