Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमॅरेथॉॅन स्पर्धेतील व्यवसाय टोळके हद्दपार करणार : नरेंद्रदादा पाटील

मॅरेथॉॅन स्पर्धेतील व्यवसाय टोळके हद्दपार करणार : नरेंद्रदादा पाटील

डॉल्बी भंग प्रकरणी संयोजकांवर गुन्हा दाखल; शाहुपूरी पोलीसांची कारवाई
सातारा : सातारा हिल मॅरेथॉनने सातार्‍याच्या क्रीडा परंपरेला उंची दिली नाही. मात्र या मॅरेथॉनमध्ये शिरलेल्या टोळक्याने शासकीय यंत्रणेला दावणीला बांधून व्यावसायिकरणाचा बाजार मांडला आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते नरेंद्र दादा पाटील यांनी केली.
मॅरेथॉनमधील काही संयोजकांनी मॅरेथॉनच्या नावाखाली पैशाचा बाजार मांडून आम्हाला अडवणारे कोणी नाही असा गैरसमज करून घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने सकाळी सहाच्या आधी डॉल्बी वाजवण्यास बंदी घातलेली असताना पोलीस, सनदी व महसुली अधिकारी काही न्यायाधीश यांच्या उपस्थितीत डॉल्बी सिस्टिम वाजवण्यात आली. हा सर्वोच्च न्यायालयाचा सरळ सरळ अवमान आहे. गेल्या सात वर्षात प्रथमच मॅरेथॉनच्या संयोजकांवर ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे अभिनंदन करायला हवे. मात्र येथून मागे पोलीस यंत्रणेच्या दबावापुढे मॅरेथॉनच्या संयोजकांवर गुन्हा सुध्दा दाखल केला नव्हता मात्र ते धाडस यंदा शाहूपुरी पोलिसांनी दाखवले आहे. हिल मॅरेथॉनची चळवळ काही डॉक्टर संयोजकांनी वेगळ्या उंचीवर नेली. मात्र काही गल्लाभरूंचे टोळके या चळवळीत शिरले आहे.
क्रांतिकारकांचा जिल्हा असणार्‍या सातारा जिल्हयात सातारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाचे नाव बदलून पीएनबी मेटलाई करण्याचे दुष्ट कर्म या मंडळीनी केले हे अजिबात योग्य नाही. मेटलाई मध्ये रियल इस्टेट मध्ये माया कमविणार्‍यांचा मोठा फायदा आहे. सातारा हिल्स मॅरेथॉनची धर्मादाय नोंदणी करून त्याची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करण्याचे कारण काय होते? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला. सातार्‍याच्या पूर्व टोकाकडून मॅरेथॉन सुरू करून शहराच्या पश्चिम टोकाला ती संपवायची आणि त्याकरिता सातारकरांची अडवणूक करून त्यासाठी शासकीय यंत्रणा दावणीला लावायची हे गणित समजलेले नाही. मात्र शासकीय, महसुली सनदी व पोलीस यंत्रणेतील सर्व सहभागी अधिकार्‍यांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
या इव्हेंटच्या एका कंपनीकडे प्रवेशिकाच्या नावाखाली प्रचंड पैसा गोळा करण्यात आला आणि मॅरेथॉनच्या नावाखाली प्रतापसिंह शेती फार्म अथवा हुतात्मा नातील जागांचे प्लॉटिंग करण्याचे बेकायदा उद्योग फोफावले आहेत. पीएनबीशी संगनमत करून लाखो रुपये घेणार्‍यांनी मॅरेथॉनच्या नावाखाली सातारकरांना नाडण्याचा धंदा सुरू केल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular