फलटण: खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत फलटण तालुक्यातील नागरीकांच्या विविध प्रकारच्या तक्रारीचा आढावा घेणे करता आढावा बैठक दि.3 रोजी सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन फलटण येथे आयोजीत केली असुन यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत .
तरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, फलटण शहरातील नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त, नागरीक यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्न व तक्रारी लेखी स्वरूपामध्ये घेऊन येथे उपस्थित रहावे असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
आज फलटण येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
RELATED ARTICLES