Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीनरवणे येथे गणेश महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नरवणे येथे गणेश महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

म्हसवड : माण तालुक्यातील नरवणे येथील श्री गणेश देवस्थान हे पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नरवणे येथे एक गाव एक गणपती 164 वर्षाची पंरपरा आहे. सालाबादप्रमाणे सार्वजनिक गणेश महोत्सवानिमित्ताने दि.14 सप्टेंबर पर्यंत धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, गजीढोल, कुस्ती मैदान, अंखड हरिनाम सप्ताह असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती नरवणे ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने दिली आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर म्हसवड शहरात पोलिसांनी संचालन केले व उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
सोमवार दि.2 रोजी सांयकाळी 6 वा. श्री गणेशाचे आगमन व स्थापना. दि.4 रोजी रात्री ह.भ.प.विजय महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन, दि.5 रोजी सकाळी 9 वा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.6 रोजी सांयकाळी 7 वा. महिलांच्या साठी हळदी कुंकू कार्यक्रम, दि.7 रोजी सकाळी 9 वा. श्री गणेश सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत व सकाळी 10 वा. 45 किलो वजनी कबड्डी स्पर्धा सुरू होणार आहेत. दि. 8 रोजी सकाळी 9 वा. बालसंस्कार शिबीर, सकाळी 10 वा. 45 किलो वजनी कबड्डी स्पर्धेचा फायनल, दुपारी 12 वा. 55 किलो वजनी कबड्डी स्पर्धा सुरू, दि. 9 रोजी सकाळी 10 वा. 55 किलो वजनी कबड्डी फायनल व दुपारी 65 किलो वजनी कबड्डी स्पर्धा सुरू, दि.10 रोजी सकाळी 10 वा.65 किलो वजनी कबड्डी स्पर्धा फायनल, दुपारी 12 वा. ओपन गट कबड्डी स्पर्धा सुरू व रात्री श्री गणेश माध्यमिक विद्यालयाचा कलापथक होणार आहे. दि.11 रोजी ओपन गट कबड्डी स्पर्धेचा फायनल होणार आहे.
दि.12 रोजी सकाळी 9 वा. श्री गणेश सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ , सकाळी 10वा. टेनिस बाँल क्रिकेटचे सामने, सकाळी 11 वा. विविध गावचे गजीढोल, सांयकाळी 7 वा. अथर्वशीर्ष पठण व रात्री 9 वा. जिल्हा परिषद शाळेचा कलापथक होणार आहे. दि. 13 रोजी सकाळी 9 वा. जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर, सकाळी10 वा. क्रिकेटचे उर्वरित सामने, सकाळी 11वा.गजीढोल, दुपारी 12 वा. श्रींचा महाप्रसाद, सांयकाळी 7 वा. श्री गणेशाचे रथात आगमन व दर्शन सोहळा व रात्री कै.चि.वेदांत काटकर याचे स्मरणार्थ रंगीत संगित भारुड व भजनाचा कार्यक्रम, दि. 14 रोजी पहाटे 5 वा. श्री गणेशाची मिरवणूक विसर्जन, सकाळी 11 वा . धनगरी ओव्या, दुपारी 2 वा. भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान, रात्री 9 वा. कोल्हापूरचा आँर्केस्ट्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तरी या विविध कार्यक्रमांचा गणेश भक्तांनी व खेळाडूंनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन नरवणे ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने केले आहे. म्हसवड शहरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशाचे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.माण तालुक्यात दुष्काळाचे सावट असल्याने उत्साह थोडासा कमीच जाणवत आहे.परंतु उरमोडीचे पाणी माण नदीत सोडल्याने बळीराजाला थोडासा आधार मिळाला आहे,पण हे नदीकाठच्या लोकांसाठी आहे.
नरवणे येथे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात म्हणजे सन 1855 साली या सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी या उत्सवाला 164 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यावेळी ज्या गणेश भक्तांनी एक गाव एक गणपती उत्सव साजरा करण्याचा जो निर्णय घेतला होता. तिच परंपरा अखंडपणे नरवणे ग्रामस्थांनी जोपासली आहे. गेली 164 वर्षाची परंपरा जपत धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक असे अनेक उपक्रम हा सार्वजनिक गणेश उत्सव राबवित असतो. या उत्सवाची गणेशमूर्ती पारंपारिक असून पूर्वी ज्या पध्दतीची बसवित होते. त्याच पध्दतीची मूर्ती आजही बसवली जाते. हा सार्वजनिक गणेशोत्सव नरवणे ग्रामस्थ यात्रा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular