फलटण: फलटण येथील श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत उज्वल यश संपादन केले.
यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 17वर्षे वयोगटात खाली मुलींच्या संघात संस्थेच्या सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूलच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तसेच 14 वर्षे वयोगटात खाली मुलींच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात खाली स्नेहल गायकवाड हिने तृतीय तर संपदा खोपडे हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत 17 वर्षे वयोगटा खाली रसिका मोहिते या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर संस्थेच्या आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर मधील आफ्रिन शेख या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.
तालुका स्तरीय कराटे स्पर्धेत सार्थक गावडे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळविला.
या विद्यार्थ्यांना तुषार करचे, संदीप ढेंबरे या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष तुषार गांधी, सचिव मधुबाला भोसले, हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र रेपाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्वाती फुले तसेच शिक्षक-पालक आदींनी अभिनंदन केले.
श्री सदगुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत उज्वल यश
RELATED ARTICLES