Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीनित्रळ येथील चलचित्र देखाव्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नित्रळ येथील चलचित्र देखाव्याला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी : बर्‍याच वर्षांनंतर या वर्षी गणपती उत्सवात नित्रळमध्ये आवाज आला.सुस्वागतम ..सुस्वागतम… श्री गणेशभक्तांचे हार्दिक आणि अत्यंत देखण्या रुपात विराजमान झाले आहेत 64 कला व चौदा विद्यांचा स्वामी.कारण गावात या अगोदर चलचित्र देखावा करणारे हौशी कलाकार महादेव हरी वांगडे, चंद्रकांत भिवराम वांगडे व त्यानंतरच्या पिढीत विलास वांगडे व शशिकांत वांगडे परंतु यांचा वारसा यावर्षी जुन्या नव्या दमात पुन्हा एकदा सुरू केला ते संतोष बाजीराव वांगडे यांनी.नित्रळ मध्ये अनेकांचे देखावे बघण्यासारखे आहेत त्यापैकी सचिन ग.वांगडे,सुरेंद्र स.वांगडे यांनी ही देखावा सुंदर बनवला आहे.
संतोष यांनी आपल्या कलेतून जुने बालपण चलचित्र रुपी उभारले आहे.आपण जगलेले बालपण, बालपणीचे मैदानी खेळ,आजीच्या भूतांच्या गोष्टी, शाळेतील गमतीदार जीवन हे आधुनिक काळात आपल्याच मुलांचे बालपण कसे हरवले आहे व मोबाईल,संगणक आणि पालकांच्या महत्वकांक्षी वृत्तीमुळेच कसे हरवले आहे याची जाणीव करून देणारे जिव्हारी लागणारा विषय चलचित्र रुपी तयार केला आहे.आपल्या संस्कारांची आणि मार्गदर्शनाची जोड मिळाली तर आपल्या मुलांचा येणारा काळ हा आदर्श व सुखाचा ही होऊ शकतो याची शिकवण ही या देखाव्यात दाखवली आहे.हा चलचित्र देखावा बघण्यासाठी आजूबाजूच्या गणेशभक्तांनी गर्दी केली असून सर्वत्र संतोष चे कौतुक होत आहे.शिवसह्याद्री परिवाराचे कुटुंबप्रमुख व नित्रळ गावचे सुपुत्र श्री भाई वांगडे यांनीही देखाव्याला भेट दिली व संतोषचे कौतुक केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular