औंध: औंध येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार एकाच वैद्यकीय अधिकार्यावर चालत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत असून सोमवारी औंध येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी शासकीय कामानिमित्त परगावी गेल्याने रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले असून याठिकाणी त्वरीत अन्य दोन वैद्यकीय पदे भरण्याची मागणी औंध ग्रामस्थांमधून केली जात आहे.
औंध हे धार्मिक व पर्यटनस्थळदूष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. औंधशी संलग्न पंधरा ते वीस खेडयातील नागरिकांचा नियमित औंधशी संपर्क येत असतो. याठिकाणी रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालय ही उपलब्ध करण्यात आले आहे मात्र सध्या एकाच वैद्यकीय अधिकार्यांवर येथील कारभार चालत आहे. त्यामुळे नियमित कामकाजाबरोबर त्यांना शासकीय मिंटींग व अन्य कामकाजासाठी बाहेर जावे लागत असल्याने ग्रामीण रुग्णालयात येणार्या रुग्णांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. सध्या ढगाळ व विचित्र हवामानामुळे रुग्णालयात मोठी गर्दी होत आहे. सोमवार हा आठवडयाचा पहिला दिवस असूनही शासकीय कामानिमित्त येथील वैद्यकीय अधिकारी दुपारनंतर परगावी गेल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. यावेळी याठिकाणी आलेल्या रुग्णांनी शासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मागील चार ते पाच वर्षापासून वारंवार मागणी करुनही शासनाने याठिकाणी एकाच वैद्यकीय अधिकार्यांवर येथील कारभार सुरू ठेवला असून वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले किंवा शासकीय कामानिमित्त परगावी गेले तर येथील कर्मचार्यांना नाईलाजास्तव रुग्णांना सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी आणखी दोन ते तीनवैद्यकीय पदे त्वरित भरणे गरजेचे आहे.
सध्या आजारपणामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण ग्रामीण रुग्णालयात येऊनही येथील वैद्यकीय अधिकारी शासकीय कामानिमित्त परगावी गेल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत.
याबाबत शासनाने त्वरित कारवाई नकेल्यास. रिक्त पदे त्वरित न भरल्यास औंध ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
औंध ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांविना रुग्णांची हेळसांड ; येथील रिक्त पदे त्वरित भरण्याची ग्रामस्थ,रुग्णांची मागणी ; विविध आजारांमुळे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी ; रिक्त पदे त्वरित न भरल्यास ग्रामस्थांचा आंदोलन छेडण्याचा इशारा
RELATED ARTICLES