Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीऔंध संस्थानचे अधिपती श्रीनिवास महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक

औंध संस्थानचे अधिपती श्रीनिवास महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक

औंध: औंध संस्थानचे अधिपती कै.श्रीनिवास महाराज यांच्या 118व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी औंध येथे त्यांची प्रतिमा व पादुकांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
येथील श्रीनिवास महाराज यांच्या 118पुण्यतिथी निमित्त प्रारंभी येथील श्रीयमाई मंदिरामध्ये श्रीयमाई देवीच्या उत्सवमुर्तीचे पूजन करण्यात आले तसेच श्रीनिवास महाराज यांची प्रतिमा व पादुकांचे पूजन करुन त्यांची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी वाद्यवृंदाची सलामी देण्यात आली त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी ही पालखी मिरवणूक वाद्यवृंदाच्या गजरात होळीचा टेक, मारुती मंदिर, जुने एसटी स्टँड मार्गे श्रीनिवास महाराजांच्या पंचवटी येथील समाधी स्थळाजवळ नेली. यावेळी या मिरवणुकीत श्रीयमाई श्रीनिवास विद्यालयाचे विद्यार्थी, बँड पथक सहभागी झाले होते. त्यानंतर समाधीस्थळाजवळ प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी आरती व मंत्रपठन पौरोहित्य गणेश इंगळे यांनी केले.यावेळी शंकरराव खैरमोडे, विष्णू हत्तीगोटे, उमेश थोरात, दिपक कदम, संजय माळी, प्रमोद आराधी, शशिकांत कदम, प्राचार्य एस.बी.कुंभार, एस.बी.घाडगे, एस.व्ही.कुंभार ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढील पाच दिवस याठिकाणी पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. गुरुवारी सकाळी अभिषेक, मंत्रपठन, प्रतिमा, समाधी पूजन आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत तसेच नियमित गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन आयोजित केले जाणार आहे तसेच महाप्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता केली जाणार आहे.
फोटो औंध येथे संस्थानचे अधिपती श्रीनिवास महाराज यांच्या प्रतिमा व पादुकांची पालखीतून काढलेली मिरवणूक

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular