मुंबई : मदनदादा भोसले यांच्या भक्कम पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात 13 कोटी रुपयांच्या विकासकामांना जाग्यावरच मंजुरी देत इतर प्रश्नांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेषत: लोणंद शहरासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा तर वाई तालुक्यात 10 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मदनदादा भोसले यांच्या प्रत्येक भेटीत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाची विकासाची गंगा मुख्यमंत्र्यांकडून प्रवाही केली जात आहे, हे या भेटीनेही स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मदनदादा भोसले यांनी प्रामुख्याने मांडलेल्या लोणंद शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे, बंदीस्त गटर्स, पाणी पुरवठा संबंधित कामे, स्मशानभूमी दुरुस्ती, पूल बांधकाम, नगरपंचायत इमारत नूतणीकरण, व्यापारी संकुल बांधकाम, आठवडे बाजार सुविधा कामे, भाजी मंडई, मटण मार्केट, सामाजिक सभागृह आदी 13 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. एकाचवेळी लोणंद शहराच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याने शहरात समाधान व्यक्त होत असून लोणंदच्या नव्या विकासपर्वाला आता खर्या अर्थाने प्रारंभ झाल्याचे बोलले जात आहे. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मंजुरी दिलेल्या वाई येथील प्रज्ञापाठशाळेच्या 30 हजार स्क्वे. फूट नविन इमारतीसाठी 5 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा देत हे काम दर्जेदार झालं पाहिजे असेही त्यांनी सांगून वाई येथील महागणपती पुलाच्या कामाचा प्रस्ताव तातडीने पाठवा, ते कामही आपल्याला केलं पाहिजे, असे आवर्जून सांगितले. याच बैठकीत वाई तालुक्यातील महत्वपूर्ण अशा भुईंज पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांच्या वसाहतीचा प्रश्नही मार्गी लावण्यात मदनदादा भोसले यांना यश मिळाले आहे. भुईंज येथील पोलिस ठाण्यातील अधिकारी व 35 कर्मचार्यांसाठी सुसज्ज व सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण अशा निवासी इमारतीची गरज मदनदादा भोसले यांनी मांडली असता त्यालाही त्यांनी मंजुरी दिली. 2017 साली झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नियुक्तीसाठी परीक्षेवेळी असणार्या शासन अध्यादेशाचीच अंमलबजावणी करावी अशी विनंती करुन ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे प्रश्नही मदनदादा भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडून त्यांच्या मागण्या मांडल्या. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच निर्णय होईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा नेते अनिल जाधव, मोहनआबा भोसले उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांकडून वाई मतदारसंघाला 20 कोटी; मदनदादांंचा भक्कम पाठपुरावा
RELATED ARTICLES